संपूर्ण देशात 21 जून नंतर मोफत लसीकरण-पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधत असताना लसीकरणावर मोठी घोषणा केली आहे लसीकरणाची सर्वस्वी जबाबदारी केंद्र सरकारची असून येत्या 21 जून नंतर 18 वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण मोफत करण्यात येणार असून या लसीकरणाचा सर्व खर्च केंद्र सरकार उचलणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली आहे
संपूर्ण जगभरात उत्पादनात भारत सर्वात पुढे असून वेळ पडल्यास इतर देशातून लस खरेदी केली जाईल राज्य सरकार आणि केंद्र सरकार हातात हात घालून हे काम करणार आहे लसीकरणाची मोहीम केंद्रसरकारने आखून दिलेल्या नियमाप्रमाणे झाल्यामुळे कोरोना महामारी वर आपण नियंत्रण आणू शकलो प्रत्येक राज्य सरकारने केंद्राच्या सूचना लक्षात घेऊन त्यानुसार काम केल्यामुळेच आपण हे यश मिळवू शकलो असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे खासगी रुग्णालयात 25 टक्के लसी देण्यात येणार असून खासगी रुग्णालयात एकशे पन्नास रुपयाला ही लस उपलब्ध करून दिली जाईल तसेच राज्य सरकार यांना केंद्राकडून मोफत लस पुरवठा केला जाणार असून 75 टक्के लसी केंद्र सरकार विकत घेऊन मोफत लसीकरण मोहीम राबवणार आहे
देशात कोरोना रुग्ण संख्या काही अंशी कमी होताना दिसत आहे. तसेच, लसीकरण जोरदार सुरु आहे. एकूणच कोरोनाच्या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (७ जून) जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी असं म्हटलं की कोरोनाची दुसरी लोट अजून गेली नाही त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच, येत्या २१ जूनपासून देशातील १८ वर्षावरील नागरिकांना मोफत लस देईल. केंद्र सरकार लस खरेदी करुन ती राज्यांना मोफत पुरवली जाईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ज्या लोकांना खासगी रुग्णालयात लस घ्यायची आहे, त्यांना पैसे देऊन लस घेता येईल. मात्र खासगी रुग्णालये १५० रुपये अतिरिक्त चार्ज लावूनच लस देऊ शकतात.
या किमतीवर नियंत्रण राज्य सरकारांनी ठेवावं, असं मोदी म्हणाले आहेत.याशिवाय पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेनुसार ८० कोटी नागरिकांना दिवाळीपर्यंत मोफत राशन पुरवणार असल्यांच मोदींनी नमूद केलं आहे.
दिवाळीपर्यंत ८० कोटी जनतेला मोफत राशन
मागील वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन लावावा लागला, त्यावेळी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेनुसार ८ महिने मोफत राशन पुरवलं. यावर्षीही दुसऱ्या लाटेमुळे मे आणि जूनपर्यंत ही योजना राबवण्यात आली. ही योजना आता दीपावलीपर्यंत लागू असेल. महामारीच्याकाळात सरकार गरिबांसाठी त्यांचा साथी बनून उभं आहे. नोव्हेंबरपर्यंत 80 कोटी लोकांना मोफत धान्य मिळेल.
लसीकरणाचा वेग विकसित देशांपेक्षा जास्त, कोविन अॅपची जगात चर्चा
भारतातील लसीकरणाचा वेग विकसित देशांपेक्षा जास्त, कोविन अॅपची जगात चर्चा. एक एक डोस आवश्यक, त्याने अनेकांचे जीव वाचले. कोणत्या राज्याला किती लस ही आकडेवारी आधीच जाहीर होती. त्यावरुन वाद चुकीचा. लसीच्या उपलब्धेतनुसार लस दिली जाईल. प्रत्येकाला लस मिळेल ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
पंतप्रधान नरेंद्री मोदींच्या संबोधनातील महत्वाचे मुद्दे
- आता लसीकरणाची १०० टक्के जबाबदारी केंद्राची
- केंद्र सरकार राज्यांना मोफत लस देणार
- केंद्राच्या नियोजनानुसार लसीकरण सुरु
- १८ वर्षांवरील सगळ्यांचं मोफत लसीकरण, केंद्र लस मोफत देणार
- १ मेपासून लसीकरणाचं २५ टक्के काम राज्यांवर सोपवलं
- राज्यांजवळील २५ टक्के कामंही केंद्र करणार
- जानेवारी ते एप्रिलपर्यंत राज्यांना लसी पोहोचवल्या
- २१ जूनपासून १८ वर्षांवरील नारगिकांचं लसीकरण
-भारतात नेझल लसींच्या निर्मितीवर भर
-परदेशातून लस भारतात आणण्यावर भर - कोरोना लसींचा पुरवठा वाढणार
- देशात कोविड योद्ध्यांचं लसीकरण पुर्ण
-परदेशी कंपन्यांसोबत करार केले - जुन्या सरकारांच्या काळातील पद्धतीनं काम केलं असतं तर देशात लसीकरणासाठी ४० वर्षे लागतील. २०१४ नंतर लसीकरणाचा वेग वाढवला.
- देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं थैमान
- देशात नव्या आरोग्य सुविधा उभारल्या
- कोरोना काळात सर्वाधिक औषधं निर्मिती केली
- कोरोना लस हे आपलं सुरक्षा कवचं
- एका वर्षात भारतात २ लसींची निर्मिती
- देशात २३ कोटी नागरिकांचं लसीकरण पुर्ण
- जगात भारत लसीकरणात मागे नाही
- कोरोनाला हरवण्यासाठी नियमांचं पालन करा
- ऑक्सिजनसाठी हवाई दलाची मदत घेतली
- मिशन कोविड सुरक्षेअंतर्गत लस निर्मिती