बीड

दिलासादायक:बीड जिल्ह्यात आज फक्त 155 पॉझिटिव्ह रुग्ण:बीड शहरात फक्त चारच रुग्ण

बीड जिल्ह्यात आज दि 7 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2845 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 155 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2690 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 18 आष्टी 35 बीड 20 धारूर 11 गेवराई 13, केज 21 माजलगाव 3 परळी 3 पाटोदा 5, शिरूर 19 वडवणी 7 असे रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यात १२ हजार ५५७ नवीन रुग्णांचे निदान

मुंबई: राज्यात दैनंदिन नव्या करोना (Coronavirus) बाधित रुग्णांचा आकडा आणखी खाली घसरला असून दिवसभरात १२ हजार ५५७ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आज निदान झालेल्या रुग्णांच्या संख्येहून अधिकच आहे. आज एकूण १४ हजार ४३३ इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच, आज मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा आकडाही घसरला असून दिवसभरात २३३ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
आजच्या २३३ मृत्यूच्या आकड्याबरोबरच राज्यातील मृत्यूदर १.७२ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५५ लाख ४३ हजार २६७ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.०५ टक्क्यांवर पोहोचले आहे.
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ८५ हजार ५२७ इतकी झाली आहे.

देशात कोरोनाची दुसरी लाट आता ओसरु लागली

मागील २४ तासांत १ लाख ६३६ नवे रुग्‍ण आढळले. तर २ हजार ४२७ रुग्‍णांचा मृत्‍यू झाला. १ लाख ७४ हजार ३९९ रुग्‍ण कोरोनामुक्‍त झाले आहेत.नव्‍या रग्‍णसंख्‍येचेही ही आकडेवारी मागील दोन महिन्‍यातील सर्वात कमी आहे. अशी माहिती आरोग्‍य विभागाने आज दिली.

मागील काही दिवस रुग्‍णसंख्‍येत घट होत असल्‍याने दिलासा मिळाला आहे. मात्र रुग्‍णांच्‍या मृत्‍यू होण्‍याचे प्रमाण कायम राहिले आहे. मागील २४ तासांत २ हजार ४२७ रुग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे. देशातील ३७७ जिल्‍ह्यांमधील कोरोना संसर्गाची टक्‍केवारी ५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी आहे. यामुळे काही राज्‍यांनी अनलॉक प्रक्रिया सुरु केली आहे. तर काही राज्‍यांतील जिल्‍ह्यांमध्‍ये निर्बंध कायम आहेत.
देशभरात आतापर्यंत २ कोटी ८९ लाख ०९ हजार ९७५ जण कोरोनाबाधित झाले तर २ कोटी ७१ लाख ५९ हजार १८० जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ३ लाख ४९ हजार १८६ रुग्‍णांचा बळी गेला आहे. सध्‍या १४ लाख १ हजार ६०९ रुग्‍णांवर उपचार सुरु आहेत, असेही आरोग्‍य मंत्रालयाच्‍या सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *