बीड जिल्ह्यात आज फक्त 181 पॉझिटिव्ह रुग्ण:परळीत फक्त एकच रुग्ण
बीड जिल्ह्यात आज दि 6 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3755 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 181 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3574 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 11 आष्टी 38 बीड 30 धारूर 10 गेवराई 16, केज 29 माजलगाव 12 परळी 1 पाटोदा 8, शिरूर 10 वडवणी 16 असे रुग्ण आढळून आले आहेत.
राज्यात शनिवारी १३,६५९ नवीन रुग्णांचे निदान
मुंबई : राज्यात शनिवारी १३,६५९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, ३०० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर २१ हजार ७७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एकूण ५५ लाख २८ हजार ८३४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.०१ टक्के एवढे झाले आहे. तीन महिन्यात सर्वात कमी नोंद आहे. सध्या १ लाख ८८ हजार २७ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
सध्या राज्यातील मृत्यूदर १.७१ टक्के एवढा आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५८,१९,२२४ झाली असून, मृतांचा एकूण आकडा ९९ हजार ५१२ आहे.
देशातील आजची कोरोना स्थिती
नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा आलेख उतरताना दिसत आहे. शनिवारी गेल्या दोन महिन्यातील सर्वाधिक कमी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे, गेल्या 24 तासात देशात एक लाख 14 हजार 460 कोरोना रुग्णांची भर पडली असून 2677 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात देशातील 1.89 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शनिवारी सक्रिय रुग्णांच्या आकडेवारीत 77,449 रुग्णांची कमी आली आहे.
देशात सलग 24 व्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येपेक्षा जास्त रुग्णसंख्या कोरोनामुक्त झाली आहे. शनिवारपर्यंत देशात 23 कोटी 13 लाख 22 हजार कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. शनिवारी एकाच दिवसात 33.53 लाख कोरोनाचे डोस देण्यात आले आहेत.
देशातील आजची कोरोना स्थिती :
एकूण कोरोनाबाधित : दोन कोटी 88 लाख 9 हजार 339
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 69 लाख 84 हजार 781
सक्रिय रुग्णांची एकूण संख्या : 14 लाख 77 हजार 779
मृतांचा एकूण आकडा : 3 लाख 46 हजार 759