बीड

बीड जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथिलतेची नियमावली जाहीर:काय सुरू काय बंद वाचा

बीड जिल्हयामध्ये कोविड बाधित रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट हा 8.40% असुन, व्यापलेल्या ऑक्सीजन बेड्सची टक्केवारी 47.14 % इतकी असल्याने बीड जिल्हा महाराष्ट्र शासनाचे संदर्भ क्र. 15 अन्वये घोषित
करण्यात आलेल्या तिसऱ्या स्तरामध्ये समाविष्ट होत आहे. त्या नुसार बीड जिल्हयात कोविड-19 संसर्गाचा वाढता
प्रादुर्भाव रोखणेसाठी लागु असलेले निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्यात येत असून बीड जिल्हयात दिनांक 07.06.2021 रोजी पासून शासनाकडील पुढील आदेशापर्यंत खालीलप्रमाणे आदेश निर्गमित करण्यात येत
आहेत. त्याचे विवरण खालील प्रमाणे-
तिसरा स्तर
आवश्यक सेवेच्या पुरवठ्या संबंधीची दुकाने / आस्थापना प्रत्येक दिवशी सकाळी 07.00 ते दुपारी 4.00 वा.
उघडण्याचा कालावधी
पर्यंत.
आवश्यक सेवे व्यतिरिक्त इतर दुकाने / आस्थापना सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते दुपारी
उघडण्याचा कालावधी
4.00 वा. पर्यंत.
मॉल्स/थिएटर/नाट्यगृह इ.
| पूर्णत: बंद राहतील असे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहेत

सोमवारपासून उघडणार
हॉटेल, सलूनसह सर्व दुकाने

बीड-राज्य सरकारने अनलॉकची प्रक्रिया सुरु करून तसे निर्देश दिल्यानंतर आता बीड जिल्ह्यातही अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. बीड जिल्हा तिसऱ्या गटात येत असल्याने आता बीड जिल्ह्यात उद्यापासून हॉटेल, सलूनसह सर्व दुकाने उघडता येणार आहेत. सकाळी ७ वाजल्यापासून ते दुपारी ४ वाजेपर्यंत यात व्यवहार करता येणार आहे.यातील अत्यावश सेवेतील दुकाने आठवड्याचे सर्व दिवस तर इतर दुकाने शनिवार रविवार वगळता इतर ५ दिवस उघडता येणार आहेत. तसेच आता बीड जिल्ह्यातून आंतरजिल्हा प्रवसासाठी ई-पासची देखील गरज पडणार नाही. एसटीबसची सेवा देखील सुरु होणार आहे. त्यामुळे दोन महिन्यानंतर जिल्ह्याला मोकळा श्वास घेता येणार आहे. अनलॉकच्या संदर्भातील आदेश बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी काढले आहेत.
राज्य शासनाने राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यानुसार आता ५ गटात वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे निर्बंध हटविण्यात येणार आहेत. बीड जिल्हयाचा समावेश तिसऱ्या गटात आहे. याठिकाणी अत्यावशक आणि इतर सर्व व्यवहार आता सुरु करता येणार आहेत. फक्त त्यासाठी वेळेचे मर्यादा घालून देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील व्यवसायांसह इतर सर्व व्यवसाय सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत सुरु ठेवता येणार आहेत. अत्यावश्यक व्यवसाय रोज तर इतर व्यवसाय शनिवार,रविवार वगळता आठवड्यातील ५ दिवस सुरु राहतील. तर हॉटेल ५० % क्षमतेने आठवड्यातील ५ दिवस सुरु करता येणार आहेत. दुपारी ४ नंतर हॉटेलला पार्सल सेवा देता येईल. सलून देखील दुपारी ४ वाजेपर्यंत आणि ५०% क्षमतेने सुरु ठेवता येतील. ज्या ठिकाणी साईटवर मजुरांच्या राहण्याची सोय आहे अशी बांधकामे देखील सुरु करता येतील.
क्रीडांगण , मैदाने, पार्क सकाळी ९ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत, तर चित्रपटगृहे आणि मॉल मात्र बंदच राहणार आहेत.सार्वजनिक आणि खाजगी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरु राहणार असून खाजगी वाहतुकीसाठी पासची आवश्यकता राहणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *