आनंदाची बातमी:महाराष्ट्रात मान्सून दाखल;आता सुरू होणार शेतीच्या कामाची लगबग
मुंबई : केरळमधून वेगवान वाटचाल करत मान्सूनने महाराष्ट्रात धडक दिली आहे. यंदा हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाच्या ५ दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रात (Monsoon in Maharahstra 2021) दाखल झाला. मान्सूनच्या आगमनाच्या वृत्ताने बळीराज सुखावला आहे.
‘मान्सून आज महाराष्ट्रात दाखल झाला. मान्सून रेषा राज्यात द.कोकणात हर्णेपर्यंत तसंच द.मध्य महाराष्ट्रात सोलापूरपर्यंत आहे. मराठवाड्याचा काही सलग्न भाग असून परिस्थिती पुढच्या वाटचालीसाठी अनुकूल आहे,’ अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली.
मान्सून महाराष्ट्रात १० जूनला दाखल होईल, असा अंदाज याआधी हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. मात्र ३ जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर दोन ते दिवसात मान्सूनचं आगमन होईल, असं सांगितलं गेलं. मात्र वेगवान प्रवास करत आज मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला.