सोमवार पासून लालपरीचा प्रवास सुरु:एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ शकता
दि.०७/०६/२०२१ पासुन एसटी बस सेवा बीड विभागात सुरु होत असले बाबत कोरोनाच्या पार्श्वभुमीवर बीड जिल्हयातील रा.प.बस वाहतुक साधारणतः एप्रील २०२१ पासुन बंद ठेवण्यात आली होती. दि.०७/०६/२०२१ पासुन एसटी बस सेवा आगार निहाय खालील मार्गावर सुरु करण्यात येत आहे.तसेच सदर सेवेस मिळणारा प्रवाशी प्रतिसाद पाहुन अन्य मार्गावर बसेसेवा सुरु करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. तरी सर्व प्रवाशांनी एस टी बस मध्ये प्रवास करते वेळी मास्क सॅनीटायझर वापरणे व
शासकीय आरोग्य विषयक सुचनांचे पालन करावे व राज्य परिवहन बसनेच प्रवास करावा असे आवाहन कालिदास लांडगे विभाग नियंत्रक बीड यांचे मार्फत करण्यात येत आहे.
आगार निहाय दि.०७/०६/२०२१ पासुन सुरु करण्यात येणारे मार्ग
१)बीड आगार – परळी,नांदेड,परभणी,अंबाजोगाई,लातुर,औरंगाबाद,जालना,सोलापुर,पुणे, मुंबई ई.
०२)परळी आगार बीड,परभणी,लातुर,अंबाजोगाई,नांदेड,सोनपेठ ई.
०३)धारुर आगार- बीड,अंबाजोगाई,केज,तेलगाव, पुणे ई.
०४) माजलगाव आगार – लातुर,परळी,परभणी,नांदेड,सोलापुर,कोल्हापुर,बीड-मुंबई,गेवराई,आष्टी ई.
०५)गेवराई आगार – माजलगाव,परभणी,नांदेड,
शेवगाव, पुणे,जालना,औरंगाबाद ई.
०६)पाटोदा आगार – पुणे,बीड,परळी,मुंबई ई.
०७) आष्टी आगार -पुणे ,स्वारगेट,नगर ,मुंबई,
बीड ई.
०८) अंबाजोगाई आगार – बीड,परळी ,औरंगाबाद ,लातुर ,अहमदपुर ,पुणे ,धारुर,परभणी ई.