जिल्हा क्रीडा संकुलाचे दिड कोटी भाडे थकले:कारवाईचा इशारा
जिल्हा क्रीडा संकुल,बीड अंतर्गत गाळयाचे थकीत भाडे तातडीने भरावेत अन्यथा गाळे धारकावर कारवाई करण्यात येणार आहे तश्या नोटिसा प्रत्येकाला दिल्या असून काही नोटीस दुकानावर लावण्यात आल्या आहेत,एकूण 59 गाळे असून या गाळे धारकांकडे प्रत्येकी सुमारे 2 ते अडीच लाख थकबाकी आहे त्यामुळे एकूण थकबाकी दीड कोटीच्या घरात आहे
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,बीड यांनी जिल्हा क्रीडा संकुल, बीड अंतर्गत नावे असलेल्या गाळयाचे थकीत भाडे भरण्या संदर्भात या अगोदरच वेळोवेळी नोटीस पाठवण्यात आलेल्या
आहेत. तसेच संकुल समितीच्या कर्मचाऱ्या मार्फत वेळोवेळी प्रत्यक्ष सूचनाही देण्यात आलेल्या आहेत.
तरीही गाळयाचे पूर्ण थकीत भाडे अद्याप पर्यंत भरलेले नाही.ही बाब अत्यंत गंभीर
स्वरूपाची आहे. त्यामुळे नोटीसव्दारे पुन:श्चय कळविण्यात आले आहे की, आपण थकीत गाळा भाडे तात्काळ Coll and President Stadium Committee, Beed या नावाने धनादेशाव्दारे अथवा
रोख रक्कमेव्दारे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बीड येथे कार्यालयीन वेळेत जमा करावे. अन्यथा
आपणावर नियमानुसार योग्य ती कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल, याची गांर्भीयानी नोंद घ्यावी.अशी नोटीस अरविंद विद्यागर
जिल्हा क्रीडा अधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा क्रीडा संकुल समिती, बीड.यांनी दिली आहे याबाबत जिल्हाधिकारी देखील कारवाई करण्याचा तयारीत आहेत, अनेक गाळे धारक स्वतः व्यवसाय न करता भाडे तत्वावर गाळे देऊन भाडे देतात मात्र क्रीडा संकुलाचे पैसे भरत नसल्याचे निदर्शनास येत आहे