बीड

आजही दिलासा:बीड जिल्ह्यात आज फक्त 243 पॉझिटिव्ह रुग्ण

बीड जिल्ह्यात आज दि 5 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3958 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 243 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3715 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 16 आष्टी 39 बीड 38 धारूर 20 गेवराई 14, केज 29 माजलगाव 29 परळी 4 पाटोदा 34, शिरूर 10 वडवणी 10 असे रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यातही कोरोना ओसरू लागला:आकडा 15 हजाराच्या खाली

मुंबईः राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलेलं असून, रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत होती. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ठाकरे सरकारनं केलेल्या प्रयत्नांनाही यश येताना दिसतंय. राज्यात आज 14,152 रुग्ण सापडलेत. राज्यातील कोरोना संक्रमणाचं प्रमाण हळूहळू कमी होत असल्याचं चित्र निर्माण झालंय. त्यामुळे येत्या काही दिवसांत महाराष्ट्र पुन्हा अनलॉक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यात आज 14,152 नवीन रुग्णांचे निदान झाले असून, राज्यात आज 289 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय.
त्यामुळे मृत्यूदर हा 1.67 टक्के एवढा झालाय. राज्यात आज 14,152 नवीन रुग्ण सापडल्यानंतर आज रोजी एकूण 1,96,894 सक्रिय रुग्ण आहेत. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 58,05,565 झालीय.
राज्यात आज 20,852 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत, राज्यात आजमितीस एकूण 55,07,058 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.86 % एवढे झाले

देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये घट

नवी दिल्ली : देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्येही घट होत आहे. शुक्रवारी या संसर्गामुळे २,७१३ जण मरण पावले. गुरुवारपेक्षा हा आकडा १७४ ने कमी आहे. नव्या रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत असून शुक्रवारी १ लाख ३२ हजार ३६४ नवे रुग्ण सापडले व २ लाख ७ हजार ७१ जण बरे झाले.

देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या २ कोटी ८५ लाख ७४ हजार ३५० आहे. त्यातील २ कोटी ६५ लाख ९७ हजार ६५५ जण बरे झाले. कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या ३ लाख ४० हजार ७०२ इतकी आहे. कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय असून ते आता ९३.०८ टक्के झाले आहे. तर संसर्ग होण्याचे प्रमाण आता ६.५ टक्के आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *