महाराष्ट्र 5 टप्यात अनलॉक होणार:पहिल्या टप्प्यात 18 जिल्हे तर दुसऱ्या टप्प्यात 5 जिल्ह्यांचा समावेश
राज्यातील कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत लागू केलेले कठोर निर्बंध आता हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णांची संख्या कमी होत असल्याने राज्यात एकूण पाच टप्प्यात अनलॉक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांत सर्व सेवा, सुविधा सुरू होणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात असलेल्या जिल्ह्यांत काही निर्बंध लागू असणार आहेत.
पहिल्या टप्प्यात एकूण 18 जिल्ह्यांचा समावेश आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 5 जिल्ह्यांचा समावेश आहे.
पहिल्या टप्प्यात 18 जिल्हे,दुसर्या टप्प्यात 5 जिल्हे,तिसऱ्या टप्प्यात 10 जिल्हे,चौथ्या टप्प्यात 2 जिल्ह्यांचा समावेश असे आहेत 5 टप्पे
पहिला टप्पा – ५ टक्के पॉझिटीवेहीटी रेट आणि ऑक्सिजन २५ टक्के बेड आत आहे तिथ लॉकडाऊन राहणार नाही.
मॉल्स हॉटेल्स दुकाणे वेळेचे बंधन नाही.
पहिल्या टप्प्यात क्रीडांगण, खासगी आणि शासकीय कार्यालय पूर्ण सुरू होतील, चित्रपट गृह सुरू होतील.
जिम, सलून सुरू राहणार असून बस 100 टक्के क्षमतेने चालू होतील तसेच आंतरजिल्हा प्रवास मुभा राहणार
पहिल्या टप्प्यात क्रीडांगण, खासगी आणि शासकीय कार्यालय पूर्ण सुरू होतील, चित्रपट गृह सुरू होतील.
जिथे 5 टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन 25 टक्के बेड आत आहे, तिथ लांकडाऊन राहणार नाही. मॉल्स, हॉटेल्स, दुकाने यांना वेळेचे बंधन नाही
लॉकडाऊन शिथील करण्यासाठी 5 टप्पे ठरवले आहेत. ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्के आहे आणि ऑक्सिजनची उपलब्धता 25 टक्क्याच्या आत असेल, तिथे सर्व गोष्टी सुरु होतील
रेस्टॉरंट, माल्स, गार्डन, वॉकिंग ट्रेक सुरू होतील, खाजगी, सरकारी कार्यालये १०० टक्के सुरू होतील, थिएटर सुरू होतील, चित्रपट शुटिंगला परवानगी, सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना १०० टक्के सूट दिली आहे, ई कॉमर्स सुरू राहिल, पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही. जिम, सलून सुरू राहणार, बस १०० टक्के क्षमतेने, इतर राज्यातून येणाऱ्यांवर काही निर्बंध असतील, त्याबाबतचे आदेश नंतर काढले जातील, आंतरजिल्हा प्रवास मुभा राहिल,
पहिल्या टप्प्यात येणारे जिल्हे
औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा ,चंद्रपूर,धुळे गडचिरोली गोंदिया जळगाव, जालना लातूर नागरपूर नांदेड नाशिक परभणी,ठाणे ,वर्धा. वाशिम .यवतमाळ
आठवड्याला आढावा घेऊन निर्णय
दर आठवड्याला जिल्ह्यांचा आढावा घेणार आणि जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट बघून जिल्ह्यांचे टप्पे बदलण्याचा निर्णय होणार असल्याची माहितीही राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.