अन्यथा बीड जिल्ह्यात पुन्हा कडक लॉकडाऊन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांचा इशारा
बीड जिल्हयातील कोव्हीड – 19 रुग्ण संख्या मागील काही दिवसांपासुन कमी होत असतांना दिसत आहे. त्या
अनुषंगाने 01 जून 2021 पासुन लॉकडाऊन शिथिल करण्यात आले आहे परंतु, यामध्ये लोक नियम पाळताना दिसन येत नाहीत व त्यामुळे गर्दी वाढुन रुग्ण संख्येत भर पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तसेच लॉकडाऊन शिथील केल्यानंतर विनाकारण लोक रस्त्यावर व शासकीय कार्यालयात दिसुन येतात ही गंभीर बाब आहे. सद्यस्थितीत कोव्हीड रुग्ण संख्या जरी कमी असली तरी गर्दी केल्यास अथवा कोव्हीडचे अनुषंगाने घालुन दिलेल्या नियमांचे पालन न केल्यास पुन्हा कोव्हीडचा प्रार्दुभाव वाढु शकतो. त्यामुळे पुन्हा कडक लॉकडाऊन लावण्याची वेळ येऊ शकते किंवा कडक लॉकडाऊन केला जाईल. सबब बेशीस्त वागणारे लोक / नागरीकांच्या वागणुकीचा परिणाम सर्व समाजास त्रासदायक होऊ शकतो. सर्व लोकांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवावे व कोव्हीडचे नियम पाळुन दिनांक 15 जुन पर्यंत शासनास सहकार्य करावे. एकाचवेळी दुकानांमध्ये मोठया प्रमाणात गदी
करु नये. व सामाजिक अंतर ठेवणे तसेच मास्क घालणे जास्त गर्दीमध्ये जाणे टाळणे इत्यादी बाबतच्या नियमांचे
काटेकोरपणे पालन करणेत यावे यापुढे काविड 19 विषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार गुन्हा नोंद करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच व्यापाऱ्यांनी दुसऱ्या व्यावसायीकांकडे लक्ष वेधण्याऐवजी आपण स्वत: सामाजीक जबाबदारीचे भान ठेऊन विनापरवानगी दुकाने उघडु नयेत व उघडल्यास याची गंभीर दखल घेण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल. कोव्हीड 19 रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हयातील नागरीकांनी प्रत्येक ठिकाणी
सामाजीक अंतर ठेवावे व शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.रविंद्र जगताप
जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,बीड यांनी केलेआहे