गेवराई तालुक्यात धक्कादायक घटना:एकमेकींना वाचवताना तिघीचा बुडून मृत्यू
गेवराई – कपडे धुण्यासाठी गेलेल्या चौघी जणी नदीत बुडाल्या. यापैकी तिघींचा मृत्यू झाला आहे, तर एकीला वाचवण्यात यश आलं. बीड जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. मृतांमध्ये आई, मुलगी आणि पुतणीचा समावेश आहे. गेवराई तालुक्यातील मिरगाव इथं ही दुर्दैवी घटना घडली.
रंजना गोडबोले वय 30, शीतल गोडबोले वय 10 आणि अर्चना गोडबोले वय 10, यांचा मृतांत समावेश आहे. तर आरती गोडबोले या मुलीवर उपचार सुरु आहेत. या धक्कादायक प्रकारानंतर पोलीस आणि गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.
शीतल ,अर्चना आणि आरती या तिघी जणी पाण्यात बुडत असल्याचे पाहून रंजना गोडबोले यांनी त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले यात त्या स्वतः आणि शीतल अर्चना या दोघी बुडून मरण पावल्या .