बीड

मोठा दिलासा:बीड जिल्ह्यात आज 361 पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज दि 1 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3791 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 361 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3430 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 30 आष्टी 60 बीड 70 धारूर 17,गेवराई 24, केज 44 माजलगाव 29 परळी 12 पाटोदा 29, शिरूर 28 वडवणी 18 असे रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

मुंबई: सोमवारी राज्यात १५,०७७ नवीन रुग्णांची(Corona Patients) नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५७,४६,८९२ झाली आहे. आज ३३,००० रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५३,९५,३७० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.८८% एवढे झाले आहे.

राज्यात आज रोजी एकूण २,५३,३६७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात सोमवारी १८४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. नोंद झालेल्या एकूण १८४ मृत्यूंपैकी १३३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५१ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ३१६ ने वाढली आहे.

देशात 1 लाख 27 हजार 510 नव्या कोरोना रूग्णांची नोंद

देशात गेल्या 24 तासांत 1 लाख 27 हजार 510 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 2 लाख 55 हजार 287 रूग्णांना डिसचार्ज मिळाला असून 2 हजार 795 रूग्णांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. देशात कोरोना रूग्णांची संख्या मंदावत असल्यामुळे दिलादायक वातावरण आहे.

देशात एकून कोरोना रूग्णांची संख्या 2,81,75,044 इतकी आहे. तर आतापर्यंत 3,31,895 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर देशात उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 18,95,520 इतकी आहे. भारतात आतापर्यंत 21,60,46,638 नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *