राज्यात 15 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम
ज्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे त्या ठिकाणी काही प्रमाणात शिथिलता देण्यात येणार असून ज्या जिल्ह्यात रुग्ण संख्या अधिक आहे तेथे निरबंध कायम ठेवण्यात येतील असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे
राज्यातील 21 जिल्ह्यात राज्यातील लॉक डाऊन वाढवण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे
कडक लॉकडाऊन नाही पण निर्बंध मात्र राहणार-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
एक वर्षांपासून बंधनात आहोत आपणा सर्वांचे सहकार्य लाभले म्हणून काही अंशी आपण कोरोना वर मात करू शकलो,कोरोनाचे संकट आणि वादळ दोन्ही एकाच वेळी आले,पण प्रशासनाने यावर खूप छान कामगिरी केली,आपत्ती मध्ये केंद्राचे निकष असतात ते बदलणे गरजेचे,संकटात मदत केली पण भविष्यात यासाठी कायमस्वरूपी उपाय योजना करावी लागेल,अनेक दुर्घटना घडतात,त्यामुळे वीज तारा भूमिगत कराव्या लागतील,आपण केंद्र सरकारशी चर्चा करत आहोत
कोरोनाच्या लढाईत आपण गरिबांना धान्य वाटप केले,850 कोटी लाभार्थ्यांना जमा केले,कामगार,फेरीवाले,आदिवासी, यांनाही थेट मदत केली,निर्बंध लादने हे नाईलाजाने निर्णय घ्यावे लागले,सध्या रुग्ण संख्या कमी होत आहे,मध्यंतरी ही संख्या वाढली होती,सध्या 18 हजार रुग्ण आढळत आहेत,काही जिल्ह्यात अजूनही रुग्ण संख्या कमी नाही,ग्रामीण भागात आकडे वाढत आहेत,तिसरी लाट येणार म्हणतात यासाठी आपण आजच तयारी केली आहे,कडक लॉक डाऊन नसला तरी काही निरबंध घालावे लागत आहेत,
मध्यंतरी ऑक्सिजन चा प्रश्न खूप गंभीर झाला होता त्यामुळे आपण निर्मिती वर अधिक भर दिला,वेळप्रसंगी आपण बाहेरून ऑक्सिजन पुरवठा आणला,दिवसाला 1200 मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन सुरू आहे,पावसाळ्यात साथीचे रोग रोखणे महत्वाचे आहे,वेळीच उपचार झाले तर रुग्ण संख्या आटोक्यात राहील,कारण नसताना औषध देऊ नका यामुळे इतर साईड इफेक्ट्स होऊ लागले आहेत,आता लहान मुलांना सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे,पहिल्या लाटेत वृद्ध,दुसऱ्यात तरुण आता तिसऱ्यात बालकांना बाधा होण्याची शक्यता आहे,लसीकरण मोहीम वेगात सुरू केली आहे,लस उपलब्धते नुसार आपण टप्याटप्याने लसीकरण करत आहोत, जूनपासून लसीकरण सुरळीत होईल,लस साठा आपण खरेदी करत आहोत,12 कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे,18 ते 44 लोकांना लवकरच लसीकरण सुरू करत आहोत, एकरकमी लस खरेदीची आपली तयारी आहे,10 वी ची परीक्षा रद्द करावी लागली,ती एका निकषांवर निकाल लावले जाणार आहेत,आता 12 वी चा प्रश्न आहे,यासाठी केंद्राशी बोलत आहोत, हे धोरण केंद्राने ठरवणे गरजेचे आहे,लॉक डाऊन असला तरी अर्थ चक्र सुरू राहणे महत्वाचे आहे यासाठी जनतेचे सहकार्य असायला हवे,आपण ते करत आहात,प्रत्येकाने आता मी माझं गाव कोरोना मुक्त गाव ही मोहीम राबवायला हवे,काही गावांनी हे करून दाखवले आहे,सरकारी यंत्रणा तुमच्या बरोबर आहे