दिलासा:बीड जिल्ह्यात 833 जण झाले कोरोनामुक्त:आज एकही मृत्यू नाही
बीड- जिल्ह्यात आज दि 29 रोजी 833 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आजही चांगले आहे
जिल्हा प्रशासन,आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आणि डॉक्टरांच्या अथक प्रयत्नातून रुग्ण बरे होऊन घरी जात आहे आज तब्बल 833 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत त्यांना आजच डिस्चार्ज देण्यात आला आहे
सध्या बीड जिल्ह्यात 85546 एकूण कोरोना बाधीत संख्या असून यापैकी 78320 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट 16.21% असून बरे होण्याचे प्रमाण 91.55%आहे तर मृत्यू दर 2.28% आहे
सध्या 7802 बेड शिल्लक असून सध्या 5274 रुग्णांवर उपचार सुरू आहेत बीड जिल्ह्यात 13076 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे, जिल्हा प्रशासनाने शासकीय रुग्णालय याबरोबरच जिल्ह्यातील मोठमोठे खाजगी दवाखाने रुग्णांसाठी आरक्षित केले आहेत सध्या जिल्ह्यात 174 ठिकाणी कोविड केअर सेंटरवर उपचारासाठी सुविधा तयार करण्यात आली आहे, सर्वांनी प्रशासनाचे नियमांचे पालन करावे,आपली आपल्या माणसांची काळजी घ्यावी,आतापर्यंत जिल्ह्यातील 1952 रुग्ण दगावले आहेत आज एकही रुग्णाचा मृत्यू झाला नाही ही दिलासादायक बाब आहे