मंत्रिमंडळ बैठक संपली:लॉक डाऊन बाबतचा निर्णय झाला
राज्यात लागू करण्यात आलेला लॉकडाउन १ जून रोजी संपत असून तो पुन्हा वाढवला जाणार की उठवला जाणार का याबाबत आज मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम निर्णय झाला असून याबाबत तज्ज्ञांशी चर्चा करूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निर्णय जाहीर करतील असे सांगण्यात आले आहे.
तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता सध्या राज्य सरकारकडून तयारी सुरु असून त्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन वाढवला जाऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लॉकडाउनसंबंधी महत्वाचं विधान केलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“रेड झोनमधील गावांना सध्या कोणताही धोका पत्करण्याची गरज नाही. त्या जिल्ह्यात जास्त रुग्णसंख्या असणाऱ्या तालुक्यांमध्ये कडक निर्बंध करावेत आणि ज्या तालुक्यात रुग्ण नाही तिथे थोडी सवलत द्यावी. तसंच बाकीच्या जिल्ह्यात मात्र टप्प्यापटप्य्याने लॉकडाउन कमी करावा आणि शिथीलता द्यावी असा विचार असून त्यादृष्टीने पाऊल टाकत आहोत,” असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.
“राज्यात ३१ तारखेपर्यंत लॉकडाऊन आहे. राज्यातील १५ जिल्हे असे आहेत जिथे पॉझिटिव्हीटी रेट १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. काही जिल्ह्यात तीन ते पाच टक्के प्रमाण आहे. सरसकट लॉकडाउन उठवता येत नाही. परिस्थितीचा आढावा घेऊनच लॉकडाउनसंदर्भात निर्णय घेतला जाईल. पण लॉकडाउन सरसकट उठवणं अडचणीचं ठरेल. निर्बंध शिथील करण्यासंबंधी मुख्यमंत्री ३१ मे च्या आधी निर्णय घेतील,” असं राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात करोना स्थितीसंबंधी विचारण्यात आलं असता उद्धव ठाकरे म्हणाले होते की,“सध्याचा करोना विषाणू फार घातक आहे, अत्यंत वेगाने पसरतो. काही पटींमध्ये लोकांना हा बाधित करत आहे. सध्या गेल्या वेळच्या तुलनेत वाईट परिस्थिती आहे हे लक्षात घेतल्यानंतर पुढे कधी आपण निर्बंध शिथील करु तेव्हा मागील अनुभवातून शहाणं व्हावं लागेल. सुरक्षेचे नियम पाळावेच लागतील,” असंही ते म्हणाले. दरम्यान लॉकडाउन वाढणार का असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “सध्या परिस्थिती आटोक्यात असून त्यानुसार नंतर निर्णय घेऊ, पण कोणीहा गाफील राहू नये”.
राज्यातील लॉक डाऊन मध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्याचाही निर्णय आज घेण्यात आला आहे मात्र ज्या जिल्ह्यात व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे तेथे लॉक डाऊन वाढवण्यात येणार आहे याबाबत मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार आहेत येत्या 2 दिवसात हा निर्णय जाहीर होणार आहे
अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार
राज्यात काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होत असली तरी काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. २१ जिल्ह्यांत करोना संसर्गाचा पॉझिटिव्हिटी दर जास्त आहे. त्यामुळे लॉकडाऊन सरसकट उठवता येणार नाही. रुग्णसंख्या वाढती असेल तर त्यासोबत बेड उपलब्धतेसह इतरही प्रश्न निर्माण होत असतात. त्यामुळे त्याचा विचार करून निर्णय घ्यावे लागतील. म्हणून लॉकडाऊन कायम ठेवून काही प्रमाणात शिथीलता देण्याचा विचार आहे. जिथे रुग्णसंख्या कमी होत आहे तिथे काही निर्बंध शिथील केले जातील. सध्या जे निर्बंध लागू आहेत त्यात वेळेच्या बाबतीत तसेच अन्य बाबतीत काही सवलती देता येतील का यावर विचारविनिमय करून निर्णय होईल. आज मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा झाली असली तरी अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे टोपे यांनी नमूद केले.