बीड जिल्ह्यात आज 749 पॉझिटिव्ह:बीडचा आकडा आजही दोनशेच्यावरच
बीड जिल्ह्यात आज दि 25 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 5318जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 749 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 4569 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 44 आष्टी 97 बीड 210 धारूर 58 गेवराई 69, केज 83 माजलगाव 45 परळी 26 पाटोदा 45, शिरूर 50 वडवणी 22 असे रुग्ण आढळून आले आहेत.
राज्यात २२ हजार नवे रुग्ण; करोनाच्या उद्रेकानंतर सर्वात मोठी घट
मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून करोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत असताना काल त्यात सर्वात मोठी घट नोंदवली गेली आहे. गेल्या २४ तासांत करोनाचे २२ हजार १२२ नवीन रुग्ण आढळले असून करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेकांनंतरची ही सर्वात निचांकी रुग्णसंख्या ठरली आहे. मुख्य म्हणजे करोना संसर्गाचे सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असलेल्या पुण्यात आज फक्त ४९४ रुग्णांची नोंद झाली. हा खूप मोठा दिलासा ठरला आहे.
राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच राज्य सरकारने १ जूनपासून लॉकडाऊनचे निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्याची तयारी सुरू केली आहे. यात पुढचे पाच ते सहा दिवस नेमकी काय स्थिती राहते हे महत्त्वाचे ठरणार आहे. ३० मेच्या आसपास तेव्हाची कोविडची स्थिती लक्षात घेऊन पुढचे पाऊल टाकले जाणार आहे. या घडामोडी घडत असतानाच आज राज्यात नवीन बाधितांचा आकडा खूप खाली आला आहे. आजची आकडेवारी सकारात्मक संकेत देणारी ठरली आहे. मुख्य म्हणजे आज करोना मृत्यूंचा आकडाही खूप कमी झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून आता ९२.९१ टक्के इतके झाले आहे.
राज्यात आज ३६१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून दिवसभरात २२ हजार १२२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर ४२ हजार ३२० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
करोनाची आजची आकडेवारी
- राज्यात आज ३६१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील करोना मृत्यूदर १.५९ % एवढा आहे.
- आज राज्यात २२ हजार १२२ नवीन रुग्णांचे निदान.
- दिवसभरात ४२ हजार ३२० रुग्ण बरे होऊन घरी.
- आजपर्यंत एकूण ५१ लाख ८२ हजार ५९२ रुग्णांची करोनावर मात.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.५१ % एवढे झाले आहे.
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३ लाख २७ हजार ५८० इतकी खाली आली आहे.