बीड

बीड जिल्ह्यात आज 824 पॉझिटिव्ह:बीडचा आकडा दोनशेच्या वरच

बीड जिल्ह्यात आज दि 24 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 6529 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 824 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 5705 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 57 आष्टी 182 बीड 201 धारूर 44 गेवराई 54, केज 78 माजलगाव 51 परळी 21 पाटोदा 65, शिरूर 49 वडवणी 22 असे रुग्ण आढळून आले आहेत.

महाराष्ट्राला पुन्हा दिलासा:करोना रुग्णांची संख्या झाली कमी

मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्राला हैराण केल्यानंतर आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला. तसंच वाढत्या करोनाबाधितांच्या संख्येमुळे सर्वसामान्य नागरिकही हवालदिल झाले होते. मात्र आता दिवसागणिक बाधित रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. काल रविवारी राज्यात २९ हजार १७७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर नव्या २६ हजार ६७२ रुग्णांचं निदान झालं आहे.
राज्यात काल ५९४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५९ टक्के एवढा आहे.
महाराष्ट्रात आजपर्यंत एकूण ५१ लाख ४० हजार २७२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.१२ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,३०,१३,५१६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५५,७९,८९७ (१६.९टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

रविवारी २ लाख २२ हजार ३१५ करोनाबाधित रुग्ण आढळले

सोमवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात रविवारी (२३ मे २०२१) २ लाख २२ हजार ३१५ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ६७ लाख ५२ हजार ४४७ वर पोहचलीय. देशात सध्या २७ लाख २० हजार ७१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
तर याच २४ तासांत तब्बल ३ लाख ०२ हजार ५४४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशात आत्तापर्यंत २ कोटी ३७ लाख २८ हजार ०११ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत.
एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : २ कोटी ६७ लाख ५२ हजार ४४७
एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : २ कोटी ३७ लाख २८ हजार ०११
उपचार सुरू : २७ लाख २० हजार ७१६
एकूण मृत्यू : ३ लाख ०३ हजार ७२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *