बीड

चार आकड्यावरून तीन आकड्यावर:बीड जिल्ह्यात आज 789 कोरोना पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज दि 22 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 5520 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 789 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 4731 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 69 आष्टी 69 बीड 195 धारूर 47 गेवराई 103, केज 75 माजलगाव 42 परळी 57 पाटोदा 53, शिरूर 57 वडवणी 22 असे रुग्ण आढळून आले आहेत.

दि 18 रोजी 1423 मृत्यू ची नोंद होती तर दि 21 रोजी 1703 इतकी नोंद करण्यात आली म्हणजे 4 दिवसात 280 जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली जिल्ह्यात झालेल्या मृत्यूची आकडेवारी अपडेट करूनच नोंदवली असल्याचे सांगण्यात आले खाजगी असो की सरकारी रुग्णालयात झालेल्या मृत्यूची नोंद का केली जात नाही की लपवली जाते असा संशय व्यक्त करण्यात येत आहे

राज्यात २९ हजार ६४४ नवीन रुग्णांचे निदान

मुंबई: राज्यात करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम दिसत असून करोनाचा ग्राफ गेले काही दिवस खाली येताना दिसत आहे. राज्यात आजही नवीन करोना बाधितांचा आकडा ३० हजारच्या खाली राहिला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २९ हजार ६४४ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर त्याचवेळी ४४ हजार ४९३ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. दरम्यान, करोनाच्या विळख्यात सापडलेल्या आणखी ५५५ रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे.

राज्यात लसीकरणासोबतच आरोग्य सुविधा वाढवण्यावर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे. ऑक्सिजन तुटवडा, बेडची उपलब्धता, रेमडेसिवीर व अन्य औषधांचा पुरवठा या बाबी नियोजनबद्धपणे हाताळण्यात येत असल्याने राज्यातील करोना स्थितीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात आले आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येचा उद्रेक होऊन सर्व यंत्रणा कोलमडल्याचे चित्र होते. ती स्थिती आज राहिलेली नाही. नवीन बाधितांचा आकडा अजूनही तसा मोठा असला तरी तुलनेत त्यापेक्षा अधिक संख्येने रुग्ण बरे होऊन घरी परतत असल्याने आरोग्य यंत्रणेलाही काहीसा दिलासा मिळाला आहे.
राज्यात करोनामृत्यूंचे वाढते प्रमाण कमी करण्याचे आव्हान कायम आहे. आजही ५५५ रुग्ण करोनाने दगावले असून आतापर्यंत राज्यात ८६ हजार ६१८ रुग्णांना प्राणास मुकावे लागले आहे. राज्यातील करोना मृत्यूदर सध्या १.५७ टक्के एवढा आहे. दुसरीकडे राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता पावणेचार लाखांच्याही खाली आली आहे. राज्यात सध्या ३ लाख ६७ हजार १२१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सर्वाधिक ५८ हजार ८४० अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. त्यानंतर मुंबई महापालिका क्षेत्रात २८ हजार ५७९, ठाणे जिल्ह्यात २६ हजार २४८ आणि नागपूर जिल्ह्यात १९ हजार ७४५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
करोनाची आजची स्थिती:

  • राज्यात आज ५५५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.५७ % एवढा आहे.
  • आज राज्यात २९ हजार ६४४ नवीन रुग्णांचे निदान.
  • दिवसभरात ४४ हजार ४९३ रुग्ण बरे होऊन परतले घरी.
  • आजपर्यंत एकूण ५० लाख ७० हजार ८०१ करोना बाधित रुग्ण झाले बरे.
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.७४ % एवढे.

दिलासा ! देशात नव्या रुग्णापेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक

नवी दिल्ली – देशात काल एकाच दिवसात 2,59,551 नव्या करोनाबाधितांची भर पडली असून 4209 रुग्णांना करोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर काल दिवसभऱात 3,57,295 रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

बुधवारच्या तुलनेत देशातील सक्रिय रुग्णांची संख्या एक लाख एक हजार 953 ने कमी झाली आहे. देशात बुधवारी 2 लाख 76 हजार नव्या रुग्णांची भर पडली होती, तर 3874 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्याचबरोबर देशात आतापर्यंत 19 कोटी 18 लाख 79 हजार 503 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

तर काल एकाच दिवशी देशात 14 लाख 82 हजार 754 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. आतापर्यंत 32 कोटीहून जास्त करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *