ऑनलाइन वृत्तसेवामहाराष्ट्रमुंबई

महाराष्ट्रात परतणाऱ्या प्रवाशांसाठी RT-PCR चाचणी निगेटिव्ह असणं बंधनकारक

मुंबई | महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांना आता RTPCR चाचणी निगेटिव्ह असणे गरजेचं असणार आहे.ट्रेनमधून प्रवास करणा-या प्रवाशांना ट्रेनमध्ये चढताना, प्रवासात आणि गंतव्यस्थानावर कोविड -१९ योग्य नियम पालनाच्या सूचना देण्यात येत आहे.

राज्य सरकारच्या ‘ब्रेक द चेन’ मोहिमेनुसार, वाहतुकीच्या कोणत्याही मार्गाने महाराष्ट्रात प्रवेश करणा-या कोणत्याही व्यक्तीस आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल घ्यावा लागेल, जो महाराष्ट्रात प्रवेश करण्यापूर्वी ४८ तास अगोदर केलेला असेल.

आदेशानुसार केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली आणि एनसीआर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधून जिथे जास्त रूग्ण आहेत अशा राज्यांमधून आलेल्या व्यक्तींना लागू करण्यात आलेली सर्व निर्बंधे देशाच्या कोणत्याही भागातून महाराष्ट्र राज्यात येणार्‍या प्रत्येकाला लागू असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *