बीड

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तेविशे लोकांवर पोलीसांची कारवाई:6 लाखाचा दंड वसूल

राज्यामध्ये कोव्हिड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंध व नियंत्रण ठेवणे करीता राज्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग कायदा 1897, CRPC 144 कलम आणि या संदर्भातील शासनाचे इतर अधिनियम लागू करण्यात आलेले आहेत.सध्याच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे . कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्यशासनाने कडक निर्बंध लावलेले आहेत.


जमावबंदी आदेशाचे तसेच कोरोना (कोव्हिड-19) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजना मधील अधिसूचनाचे उल्लघन करणाऱ्यांवर कडक कारवाई पोलीस प्रशासन करत
आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यात भादंवि कलम 188 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. तसेच विनामास्क, विनाकारण फिरणारे, पोलीसांच्या सुचना न मानणारे, अवैध प्रवाशी वाहतुक करणारे, लॉकडाऊनच्या कालावधीत वाहनाच्या परवानगी पेक्षा जास्त प्रवाशी वाहतुक करणारे, विना पास प्रवास करणारे, तसेच कडक निबंधाच्या आदेशामध्ये सुट दिलेले दुकाने वगळता जे दुकाने व आस्थापना सुरु ठेवतील अशा प्रकारच्या व्यक्तींवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्याच्या सर्व सिमांवर चेक पोस्ट व नाकाबंदी पाईंट लावण्यात आलेले आहेत. त्यासाठी आळीपाळीने पोलीस अधिकारी व अंमलदार तैनात करण्यात आलेले आहेत.

तसेच जिल्ह्यात सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 79 फिक्स नाकाबंदी पाईंट लावण्यात आले आहेत.तसेच वेगवेगळ्या ठिकाणी अचानक नाकाबंदी पाईंटस् नेमण्यात येत आहे. पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व इतर अधिकारी व अंमलदार यांच्या गस्ती नेमण्यात आल्या आहेत.या गस्ती दरम्यान पोलीस अधिकारी पब्लीक अॅड्रेस सिस्टिम (PA System)वरून लोकांना आवाहन करत आहेत. तसेच महत्वाचे शासकीय रूग्णालये, कोव्हिड सेंटर येथे योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. दि.19/05/2021 रोजी जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत-

  1. तोंडाला मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्यांवर 1113 खटले दाखल करून 3,53,050 रु. दंड त्यांच्याकडून आकारण्यात आला आहे.
  2. विनाकारण फिरणारे , पोलीसांच्या सुचना न मानणारे, अवैध प्रवाशी वाहतुक करणारे, लॉकडाऊनच्या कालावधीत वाहनाच्या परवानगी पेक्षा जास्त प्रवाशी वाहतुक करणारे, अशा 1240 व्यक्तीवर जिल्ह्यात खटले दाखल करून 2,67,600/- रु. दंड त्यांच्याकडून आकारण्यात आला आहे.
    बीड जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाकडून दि.15-05-2021 ते 25-05-2021 या कालावधीत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तरी विनाकारण घराबाहेर पडू नये. मास्कचा वापर करावा. नियमबाह्य प्रवासी वाहतुक करू नये. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. लसीकरणासाठी रूग्णालयात जाणारे व्यक्तींनी नियम पाळावेत. नियम न पाळणाऱ्या व्यक्तींवर दाखल होणाऱ्या खटल्याची इत्यभूत माहिती पोलीस अधीक्षक कार्यालय येथे ठेवण्यात येणार आहे. तसेच सदर व्यक्तींना चारित्र्य पडताळणी पासपोर्ट, नाहरकत प्रमाणपत्र, प्रशासनाकडून मिळविण्यास अडचणी येवू शकतात. तसेच कडक निर्बंधाच्या आदेशामध्ये सुट दिलेले दुकाने वगळता जे इतर दुकाने व आस्थापना सुरु ठेवतील अशा व्यक्तींच्या दुकानांचे परवाने रद्द करणे व त्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पुढे अशा प्रकारच्या परवान्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र मिळणार नाही. अशी तरतुद करण्याचे
    प्रशासनाच्या विचाराधिन आहे. पोलीस प्रशासनाकडून बीड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे
    की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे.असे आवाहन
    जिल्हा पोलीस अधीक्षक बीड यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *