ग्रामस्थांना दिलासा देत शिवसेना खा ओमराजे निंबाळकर सतत संपर्कात
उस्मानाबाद /प्रतिनिधी
कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवून केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करत शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर कोरोना बाधीत आढलेल्या भागात जाऊन ग्रामस्थांना दिलासा देत सतत संपर्क ठेवून असल्याचे दिसत आहे
खा ओमराजे निबांळ्कर यांनी वाशी तालुक्यातील लिंगी पिंपळगाव येथे कोरोना बाधित तीन रुग्ण आढळल्याने गावास भेट देऊन आवश्यक त्या केलेल्या उपायोजनाची पाहणी करून अधिकारी समवेत सद्य स्थितीचा आढावा बैठक घेतली.दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रशासन काम करत आहे. नागरिकांनी प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, शिवसेना पदाधिकारी, गावातील तरुणांनी स्वयंपूर्तीने प्रशासनास सहकार्य करावे. त्यामुळे प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनवरील ताण कमी होईल.असे सांगून खासदार ओमराजे निंबाळकर ग्रामस्थांना आणि जनतेला धीर देऊन दिलासा देत आहे बाहेर जिल्ह्यातून राज्यातून नागरिक आपल्या स्वगृही परतत आहेत अशा व्यक्तींची प्रशासनाने नोंद घेऊन त्यांची प्रशासनाने अशा नागरिकांना योग्य माहिती देऊन त्यांना शक्यतो इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात यावे. प्रत्येक लोकांकडे 14 दिवसाच्या कार्यकाळात किमान 1 दिवसाआड आरोग्य, महसूल, नगरपालिकेचा कर्मचारी व ग्रामीण भागात ग्रामपंचायतीचा कर्मचारी भेटून त्यांच्या आरोग्याची विचारपूस करावी. कोरोना बाधित रुग्ण आढळलेल्या गावांनमध्ये तात्काळ फवारणी करावी. संबंधित अधिकारी यांनी दक्षता घ्यावी. अशा सूचनाही त्यांनी दिल्या
यावेळी शिवसेना नेते प्रशांत बाबा चेडे, बाबा घोलप, शिवसेना तालुका प्रमुख सत्यवान गपाट, तहसीलदार संदिप राजपुरे, गटविकास अधिकारी सुरेश मारकड साहेब, ग्रामसेवक बाळासाहेब हांगे, API शेख साहेब, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्रकर, सरपंच मारुती माळी, उपसरपंच रामेश्वर सुकाळे, राजाभाऊ सुकाळे, पोलिस पाटिल सुखानंद यादव, बप्पासाहेब गाडे आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.