दहावीचा निकाल (CBSE) आता आणखी लांबणीवर:बोर्डाचे नवीन शेड्यूल जारी
नवी दिल्ली, 18 मे: सीबीएसई (CBSE) दहावीचा निकाल (CBSE 10th Result 2021) आता आणखी लांबणीवर पडला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने नवीन शेड्यूल जारी केलं आहे. सर्व सीबीएसई शाळांच्या मुख्याध्यापकांना आणि संस्थापकांना नोटीस जारी केली आहे. या नोटिसीत सीबीएसई बोर्डाने नवीन शेड्युल दिलं आहे.
याआधी सीबीएसईचा दहावीचा निकाल जूनमध्ये लागणार होता पण आता निकाल जुलैमध्ये लागणार आहे. कारण सीबीएसईने मार्क्स सबमिट करण्याच्या वेळापत्रकात बदल केले आहेत.
नव्या शेड्युलनुसार मार्क्स अपलोड करण्यासाठी पोर्टल उपलब्ध राहण्याची तारीख 20 मे 2021 आहे.
या तारखेत काही बदल नाही. पण CBSE मार्क्स सबमिट करण्याची तारीख 30 जून 2021 आहे. इंटरनल असेसमेंट मार्क्स सबमिट करण्याची तारीख 30 जून 2021 आहे. त्यामुळे जूननंतर म्हणजेच जुलैमध्येच हे निकाल जारी होतील.
याआधी सीबीएसईने दहावी परीक्षांचा निकाल 20 जूनला जारी होणार असल्याचं सांगितलं होतं. त्यावेळी शाळांना बोर्डाकडे आपले मार्क्स सबमिट करण्याची तारीख 11 जून होती. पण आता कोरोनाची परिस्थिती आणि बहुतेक राज्यांमधील लॉकडाऊन पाहता ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे निकालही लांबणीवर पडला आहे. मार्क्स सबमिशनची डेट जूनच्या अखेरची असल्याने निकाल जुलैमध्येच लागणार आहे.
सीबीएसईच्या दहावी बोर्ड परीक्षा 2021 साठी प्रत्येक विषयासाठी जास्तीत जास्त 100 गुणांचं मूल्यांकन ठेवण्यात आलं आहे. त्यातील 20 गुण आंतरिक मूल्यांकन आणि 80 गुण वर्षभरात झालेल्या परीक्षांनुसार दिले जात आहेत. आतापर्यंत बहुतेक शाळांनी परीक्षांच्या मार्क्सचा डेटा सीबीएसई पोर्टलवर अपलो़ड केला आहे.