बीड

चार दिवसात साडे तीन हजार रुग्ण कोरोनामुक्त तर 101 रुग्णांचा मृत्यू

4 दिवसात 3456 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत सरासरी दररोज 1100 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर

दि 13 रोजी 1322 मृतांची संख्या होती तीच आज दि 16 रोजी 1423 इतकी आहे म्हणजे 4 दिवसात एकूण 101 रुग्णांचा मृत्यू झाला आहे सरासरी दररोज बीड जिल्ह्यात 25 रुग्ण दगावण्याची घटना घडली आहे

बीड- जिल्ह्यात आज 1085 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आजही चांगले आहे

नागरिकांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही,जिल्हा प्रशासन,आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आणि डॉक्टरांच्या अथक प्रयत्नातून शेकडो रुग्ण बरे होऊन घरी जात आहे आज तब्बल 1085 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत त्यांना आजच डिस्चार्ज देण्यात आला आहे

सध्या बीड जिल्ह्यात 74422 एकूण कोरोना बाधीत संख्या असून यापैकी 66652 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट 16.17% असून बरे होण्याचे प्रमाण 89,55%आहे तर मृत्यू दर 1.91% आहे

सध्या 6689 बेड शिल्लक असून सध्या 6347 रुग्णांवर उपचार सुरू आहेत बीड जिल्ह्यात 13036 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे, जिल्हा प्रशासनाने शासकीय रुग्णालय याबरोबरच जिल्ह्यातील मोठमोठे खाजगी दवाखाने रुग्णांसाठी आरक्षित केले आहेत सध्या जिल्ह्यात 166 ठिकाणी कोविड केअर सेंटरवर उपचारासाठी सुविधा तयार करण्यात आली आहे, सर्वांनी प्रशासनाचे नियमांचे पालन करावे,आपली आपल्या माणसांची काळजी घ्यावी,आतापर्यंत जिल्ह्यातील 1423 रुग्ण दगावले आहेत चार दिवसांपूर्वी 1322 इतकी संख्या होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *