बीड जिल्ह्यात आज 897 पॉझिटिव्ह:डिस्चार्जचा अहवाल देणे झाले बंद
बीड जिल्ह्यात आज दि 16 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4056 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 897 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3159 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
दररोज किती रुग्ण कोरोना मुक्त झाले याचा अहवाल नियमित येतो मात्र आरोग्य विभागाकडून दोन दिवसांपासून हा अहवाल दिला गेला नाही,किती रुग्ण उपचार घेतात, किती रुग्ण दगावले,ही माहिती देखील महत्वाची आहे मात्र ती न देण्यामागचे कारण समजू शकले नाही
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 97 आष्टी 119 बीड 116, धारूर 48, गेवराई 77, केज 136, माजलगाव 71, परळी 57 पाटोदा 102, शिरूर 40 वडवणी 34 असे रुग्ण आढळून आले आहेत.
राज्यात कोरोना ओसरतोय
मुंबई: राज्यात करोनाचा ग्राफ वेगाने खाली येत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ३४ हजार ८४८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून दैनंदिन रुग्णसंख्येचा हा आणखी एक निचांक ठरला आहे. दरम्यान, करोना मृत्यूंचा वाढता आकडा ही चिंतेची बाब बनली असून आज एकाच दिवशी ९६० करोना बाधितांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून नवीन बाधितांचा आकडा वेगाने खाली येताना दिसत आहे. एप्रिल महिन्यात दैनंदिन नवीन रुग्णांची संख्या ७० हजारांच्या घरात पोहचली होती. त्यात मे महिन्यात सातत्याने घसरण पाहायला मिळाली आहे. गेले काही दिवस ४० हजारांच्या आसपास नवीन बाधितांचा आकडा आहे. त्यात नवा निचांक नोंदवला गेला आहे. त्याचवेळी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वेगाने वाढत असून आजच्या नोंदीनुसार हे प्रमाण ८९ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
करोनाची कालची आकडेवारी
- राज्यात काल ९६० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- राज्यातील करोना मृत्यूदर सध्या १.५१ टक्के एवढा आहे.
- राज्यात ३४ हजार ८४८ नवीन रुग्णांचे निदान.
- दिवसभरात ५९ हजार ७३ रुग्ण बरे होऊन परतले घरी.
- आजपर्यंत एकूण ४७ लाख ६७ हजार ५३ रुग्णांची करोनावर मात.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८९.२ % एवढे झाले.
देशात 3,62,437 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त
भारतात अद्याप कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. दररोज तीन लाखांहून अधिक नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात येत आहे. दैनंदिन मृतांचा आकडाही चार हजारांवर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 311,170 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 3,62,437 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.
देशातील आजची कोरोना स्थिती :
एकूण कोरोनाबाधित रुग्ण : दोन कोटी 46 लाख 84 हजार 77
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : एक कोटी 7 लाख 95 हजार 335
एकूण सक्रिय रुग्ण : 36 लाख 18 हजार 458
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 2 लाख 70 हजार 284
देशाचा कोरोना मृत्यूदर 1.09 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रिकव्हरी रेट 83 टक्क्यांहून अधिक आहे. सक्रिय रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. कोरोना सक्रिय रुग्णांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्थानी आहे. तर जगात अमेरिका, ब्राझीलनंतर कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.