बीड जिल्ह्यात आज 1150 पॉझिटिव्ह:राज्यात व देशात कोरोना कमी होऊ लागला
बीड जिल्ह्यात आज दि 15 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4447 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1150 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3297 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 80 आष्टी 194 बीड 279 , धारूर 69, गेवराई 97, केज 103, माजलगाव 100, परळी 38, पाटोदा 67, शिरूर 92, वडवणी 31 असे रुग्ण आढळून आले आहेत.
राज्यात ५३ हजारहून अधिक रुग्ण बरे
महाराष्ट्रात मागील काही दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत चढ-उतार यला मिळत आहे. गुरुवारी राज्यात ४२ हजार ५८२ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. शुक्रवारी हा आकडा कमी झालेला दिसला. शुक्रवारी ३९ हजार ९२३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५३ लाख ९ हजार २१५ झाली असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५ लाख १९ हजार २५४ वर पोहोचली आहे. तसेच आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे शुक्रवारी मृतांच्या आकड्यातही घट झालेली दिसली. गुरुवारी ७९३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता, तर शुक्रवारी ६९५ मृतांची नोंद झाली
कोरोनाबाधित रुग्ण आणि मृतांचा आकडा कमी होत असतानाच राज्यात रुग्ण मोठ्या प्रमाणात बरेही होत आहे. आज ५३ हजार २४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ४७,०७,९८० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.६८ टक्के एवढे झाले आहे.
देशात कोरोना मुक्त रुग्णांची संख्या वाढली
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं कहर केला आहे. दरदिवशी तीन लाखांहून अधिक रुग्ण आणि चार हजारांहून जास्त मृत्यू होत आहेत. मात्र गेल्या दोन दिवसात सलग कोरोनामुक्तांची संख्या नव्या रुग्णांपेक्षा जास्त आहे. शुक्रवारी भारतात 3 लाख 26 हजार 98 नवीन रुग्ण सापडले. तर 3 लाख 53 हजार 299 जण कोरोनामुक्त झाले. तर गेल्या 24 तासात 3 हजार 890 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आतापर्यंत भारतात एकूण 2 कोटी 43 लाख 72 हजार 907 जणांना कोरोनाची लागण झाली असून 2 कोटी 4 लाख 32 हजार 898 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
तर 2 लाख 66 हजार 207 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. सध्या देशात 36 लाख 73 हजार 802 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.