वारकरी संप्रदायात मोठी पोकळी:विनोदाचार्य बाबासाहेब इंगळे महाराज यांचे निधन
आपल्या विनोद पूर्ण शैलीतून नामस्मरण सत्संग सदाचार इत्यादी गोष्टींमध्ये लोकांना प्रवृत्त करणारे आणि स्वतः नाम निष्ठ . कीर्तनकार ह भ प विनोदाचार्य बाबासाहेब महाराज इंगळे यांचे दुःखद निधन झाले आहे त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त केली जात आहे
वारकरी संप्रदायातील जेष्ठ श्रेष्ठ किर्तनकार,तब्बल 4 दशके कीर्तनाच्या माध्यमातुन संत साहित्याचा महाराष्ट्रात प्रचार आणि प्रसार केला,
वडवणी तालुक्यातील चिंचवडगाव येथे परमार्थ आश्रमाची स्थापना करून गोर गरिबांच्या मुला मुलींचे लग्न अत्यल्प दरात लावण्यासाठी पुढाकार,,,
एके काळी कॅसेट व दृष्टा नत सागर या पुस्तकाच्या माध्यमातून महाराज खेडो पाडी पोहचले होते,, इंगळे महाराजांची विनोदी शैली ही अजोड होती च्या माध्यमातून महाराजांनी ग्रामीणविनोदी शैलीतून संतांचे विचार जन माणसात पेरणारे होते
महाराष्ट्रातील ख्यातनाम किर्तनकार ह.भ.प. बाबासाहेब महाराज इंगळे यांचे अल्पशा आजाराने औरंगाबाद येथे उपचार सुरू असताना निधन झाले आहे.मागील पन्नास वर्षापासून वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन त्यांनी धर्मप्रसार केला. विविध चैनल वर त्यांचे कीर्तने संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक ऐकत असत. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. वडवणी तालुक्यातील चिंचवडगाव येथील रहिवासी असणारे बाबासाहेब महाराज इंगळे यांनी इंगळे महाराज परमार्थ आश्रमाच्या माध्यमातून चिंचवडगाव परिसरातील राजा हरिश्चंद्र पिंपरी, पिंपरखेड, देवडी, काडीवडगाव, चींचोटी या गावांमध्ये धार्मिक वातावरणाला चालना दिली होती. परिसरातील सर्व गावांना ते आपलेच गाव मानीत होते. पिंपरखेड येथे त्यांचे सान्निध्य लाभले गावांमध्ये आठ आठ दिवस राहून अखंड हरिनाम सप्ताह करणारे महाराज सर्वांसाठी कुटुंबातील सदस्य वाटत होते. असे महाराज आज आपल्यातून निघून गेल्यामुळे या परिसरामध्ये दुःखाचा डोंगर कोसळला आहे