कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर वाढवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर आता केंद्र सरकारने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या तांत्रिक सल्लागार गटानं यासंदर्भात सल्ला दिला होता. त्यानुसार आता केंद्र सरकारकडून निर्णय घेण्यात आला आहे. सध्या कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर ६ ते ८ आठवडे इतकं होतं. आता ते अंतर वाढवून १२ ते १६ आठवडे करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. अर्थात, कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर पुढील डोस थेट १२ ते १६ आठवड्यांनंतर म्हणजेच ३ ते ४ महिन्यांनंतर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गटानं सुचवलेल्या शिफारशी राष्ट्रीय तज्ज्ञांच्या गटाकडे अर्थात कडे पाठवण्या आल्या होत्या. त्याला आता मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, कोवॅक्सिन लसीच्या डोससाठी कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
दरम्यान, या गटानं गर्भवती महिलांसाठी देखील लस घेण्याची मुभा असावी असा सल्ला दिला आहे. गर्भवती महिलांना लस घेता येईल आणि स्तनदा मातांना प्रसुतीनंतर लस घेता येईल, अशी शिफारस या गटाकडून करण्यात आलेली आहे.