आजपासून पुढील आदेश येईपर्यंत पुन्हा 7 ते 11 मुभा:अत्यावश्यक सेवा चालू
बीड जिल्ह्यात दिनांक आठ मे ते बारा मे या पाच दिवसाच्या कडक लॉक डाऊनचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी 7 मे रोजी काढले होते त्यानुसार आज 13 पासून पुन्हा अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे किराणा दुकान चिकन मटन विक्रीची दुकाने बेकरी व कृषी संबंधित इत्यादी सेवा चालू राहणार असून पुढील आदेश येईपर्यंत या सेवा चालू राहणार आहेत
जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी तीन मे रोजी काढलेल्या आदेशानुसार आज बीड जिल्ह्यातील किराणा दुकान सह इतर अत्यावश्यक सेवा सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचे निवासी जिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी सांगितले आहे त्या मुळे 13 मे रोजी किराणा दुकान दूध विक्री भाजीपाला फळ विक्रीची दुकाने बेकरी या स्थापना सकाळी सात ते अकरा या वेळेत चालू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे तसेच दुपारी पाच ते सात वाजेपर्यंत हाच गाड्यावर फळ विक्रीसाठी अनुमती देण्यात आली आहे त्याचबरोबर औषधालय दवाखाने निदान क्लीनिक लसीकरण केंद्र वैद्यकीय विमा कार्यालय वैद्यकीय सेवा आणि आरोग्य सेवा वितरण युनिट पेट्रोल टपाल सेवा गॅस वितरण आधी सेवा चालू राहणार आहेत याबाबत उप जिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्याशी सम्पर्क साधला असता त्यांनीही दुजोरा दिला आहे