बीड

बीड जिल्ह्यात आज 1270 पॉझिटिव्ह:थोडासा दिलासा

बीड जिल्ह्यात आज दि 12 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4288 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1270 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3018 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 174 आष्टी 146 बीड 213 धारूर 68 गेवराई 142 केज 173 माजलगाव 74 परळी 58 पाटोदा 40 शिरूर 141 वडवणी 41

गेल्या २४ तासांत राज्यात ४० हजार ९५६ नवीन रुग्णांची भर पडली असून त्याचवेळी ७१ हजार ९६६ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. दरम्यान, आज ७९३ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूंचे वाढते प्रमाण चिंतेत भर घालणारे ठरले आहे.
सोमवारी राज्यात ३७ हजार ३२६ इतक्या नवीन रुग्णांची नोंद झाली होती. गेल्या काही आठवड्यांतील हा सर्वात निचांक ठरला होता. तर आज त्यात थोडी वाढ पाहायला मिळाली आहे. आज राज्यात ४० हजार ९५६ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी करोनावर मात करणाऱ्या रुग्णांचा आजचा आकडा मोठा राहिला आहे.मंगळवारी तब्बल ७१ हजार ९६६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यात आतापर्यंत ४५ लाख ४१ हजार ३९१ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ८७.६७ टक्के इतके झाले आहे.
राज्यातील अॅक्टिव्ह अर्थात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या सध्या ५ लाख ५८ हजार ९९६ इतकी खाली आली आहे.

देशात मंगळवारी (११ मे २०२१) ३ लाख ४८ हजार ४२१ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर याच २४ तासांत तब्बल ३ लाख ५५ हजार ३३८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. एका दिवसात ४२०५ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ३३ लाख ४० हजार ९३८ वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण २ लाख ५४ हजार १९७ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. मात्र, देशात आत्तापर्यंत १ कोटी ९३ लाख ८२ हजार ६४२ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. देशात सध्या ३७ लाख ०४ हजार ०९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : २ कोटी ३३ लाख ४० हजार ९३८
एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : १ कोटी ९३ लाख ८२ हजार ६४२
उपचार सुरू : ३७ लाख ०४ हजार ०९९
एकूण मृत्यू : २ लाख ५४ हजार १९७
करोना लसीचे डोस दिले गेले : १७ कोटी ५२ लाख ३५ हजार ९९१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *