बीड

बीड जिल्ह्यात आज 1295 पॉझिटिव्ह:आज सर्वाधिक रुग्ण केजला

बीड जिल्ह्यात आज दि 10 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4241 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1295 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2946 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 165 आष्टी 77 बीड 304 धारूर 133 गेवराई 118 केज 215 माजलगाव 64 परळी 73 पाटोदा 55 शिरूर 63 वडवणी 28

महाराष्ट्राला खूप मोठा दिलासा:60 हजाराच्या वर कोरोनामुक्त

मुंबईः रविवारी राज्यात ६० हजार २२६ जणांनी करोनावर मात केली आहे. तर ५७२ रुग्णांचा गेल्या २४ तासांत करोनामुळं मृत्यू झाला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.
मुंबईत करोना संसर्गावर नियंत्रण येत असतानाच राज्यातील रुग्णसंख्याही आटोक्यात येत आहे. गेल्या महिन्यांपासून दैनंदिन रुग्णसंख्या ६० हजारांपर्यंत पोहोचली होती. मात्र, दैनंदिन रुग्णसंख्या आता उतरणीला येत आहे. तसंच, करोना मृतांची संख्याही कमी होत असल्याचं चित्र आहे.
काल राज्यात करोना रुग्णांच्या तुलनेत करोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक आहे. गेल्या २४ तासात ४८ हजार ४०१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर, तब्बल ६० हजार २२६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळं राज्यात आजपर्यंत ४४ लाख ०७ हजार ८१८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे बरे ८६. ०४ टक्के इतके झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *