उद्या 45 च्या पुढचे तर दि 12 रोजी 18 ते 44 लोकांना लस मिळणार
बीड जिल्ह्यात लसीकरण साठी 30 हजार डोज उपलब्ध होणार असून 45 च्या पुढील लोकांना उद्याच लसीकरण करता येईल तसेच दि 12 रोजी 18 ते 44 वयाच्या लोकांना लस घेता येईल यासाठी नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पवार यांनी केले आहे
कोविड-१९ महामारीच्या प्रतिबंधासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्हयात कोविड १९ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हयात ४५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरीकांसाठी ३०,००० लससाठा
प्राप्त होणार असुन प्रत्येक प्रा.आ.केद्रांस ४०० डोसेस याप्रमाणे वितरण करण्यात येणार आहे.
दि.११/५/२०२१ रोजी ४५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरीकांसाठी जिल्हयात लसीकरण सत्र घेण्यात येणार आहेत.प्रत्येक लसीकरण सत्राच्या ठिकाणी ४०० लोकांना लस देण्यात येणार आहे.
तरी ४५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरीकांनी सोमवारी दि.१०/५/२०२१ रोजी प्रा.आ.केद्रांत जाउन नोंदणी करावी. १८ ते ४४ वर्ष वयाच्या नागरीकांसाठी कोविड लसीकरण सत्र तालुकाच्या ठिकाणी सुरु असुन या वयोगटाकरीता ८७०० लससाठा प्राप्त होणार असुन दररोज २०० डोसेस याप्रमाणात लसीकरण करण्यात येत आहे.
१८ ते ४४ वर्ष वयाच्या नागरीकांसाठी मंगळवार दि. ११/५/२०२१ पर्यंतची नोंदणी पुर्ण झाली असुन दि.१२/५/२०२१ पासुनच्या लसीकरण सत्राकरीता सोमवार १०/५/२०२१रोजी सांयकाळी ६ वाजता नोंदणी करता स्लॉट ओपन होणार आहे सांयकाळी ६ वाजेनंतर १८ ते ४४ वर्ष वयाच्या नागरीकांनी नोंदणी करुन अपॉइंटमेट नुसार लसीकरण करावे असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले असुन कोविड संसर्गाच्या पार्श्वभुमीवर नागरीकांनी अनावश्यक गर्दी टाळावी, कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करावे असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.असे डॉ राधाकिसन पवार,जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद बीड