महिना झाला सलून दुकाना बंद:केस वाढले बोकडा सारखे
बीड- कोरोना महामारी ने सर्वसामान्य माणसाचे जिने हराम केले आहे सार्वजनिक उपक्रम, नात्यागोत्याच्या भेटीगाठी आणि जवळच्या माणसाच्या कितीतरी दूर प्रत्येक जण झालेलाच आहे याच बरोबर रोजच्या गरजा देखील आता उपलब्ध नाही गेल्या महिन्याभरापासून कटिंग सलून च्या दुकाना बंद आहेत त्यामुळे डोक्यावरचे केस देखील बोकडा सारखे वाढले आहेत ही अवस्था एक नमुना म्हणून जरी असली तरी नाभिक समाजाच्या भावना देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत हातावर पोट असणारा हा समाज गेल्या महिन्याभरापासून घरातच स्वतःला कोंडून बसला आहे
संसाराचा गाडा हाकत असताना अनंत अडचणी येत असतात इतर अत्यावश्यक सेवांबरोबरच ही देखील अत्यावश्यक सेवाच आहे हे प्रशासनाने आता मान्य करायला पाहिजे इतरांप्रमाणेच सलूनच्या दुकानदारांना ठराविक वेळेत सवलत द्यायला हवी, दाढी कटिंगच्या दुकानात कोरोनाचे नियम पाळून व्यवसाय केला तर काय हरकत आहे त्यामुळे प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करायला हवा काही महिन्यात या समाजाच्या काही तरुणांनी आत्महत्या केल्याचे ऐकिवात आहे त्याचे कारणही तेच आहे हातावर पोट असताना घरच्या लेकरा बाळांना कसे जगणार असा प्रश्न त्यांच्यासमोर असावा