बीड

दिलासा:दोन दिवस 7 ते 10 मुभा:जिल्हाधिकारी यांचा सुधारित आदेश

कोविड-१९ विषाणूचा संसर्ग रोखण्याकरीता या कार्यालयाचे संदर्भ क्र.१५ चे आदेशामध्ये सुधारणा करुन खालील प्रमाणे
आदेश पारित करीत आहे.
१. शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार व बुधवार (दिनांक ०८/०५/२०२१, ०९/०५/२०२१ १०/०५/२०२१,
११/०५/२०२१ व १२/०५/२०२१) या दिवशी केवळ खालील आस्थापना पुर्णवेळ सुरु राहतील.
सर्व औषधालये (Medical), दवाखाने, निदान क्लिनीक, लसीकरण केंद्रे, वैद्यकिय विमा कार्यालये,
फार्मास्युटिकल्स, फार्मास्युटिकल कंपन्या, इतर वैद्यकिय आणि आरोग्य सेवा ज्यात सहाय्यक उत्पादन आणि
वितरण युनिट तसेच त्यांचे डिलर्स, वाहतुक आणि पुरवठा साखळी, लसींचे उत्पादन व वितरण, सॅनिटायझर्स,
मास्क, वैद्यकिय उपकरणे, कच्चा माल युनिट आणि सहाय्य सेवा, पेट्रोल पंप व पेट्रोलियमशी संबंधित उत्पादने,
टपाल सेवा इ. उपरोक्त अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या आस्थापना वगळता इतर कोणत्याही आस्थापना उपरोक्त
दिवशी चालू राहणार नाहीत.
२. शनिवार, रविवार, सोमवार (दिनांक ०८/०५/२०२१, ०९/०५/२०२१ व १०/०५/२०२१) जिल्ह्यातील सर्व
अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या आस्थापना किराणा दुकाने, ड्रायफ्रूट/सुकामेवाची दुकाने, मिठाईची दुकाने, डेअरी,
चिकन, मटन विक्रीचे दुकाने व बेकरी संबंधित इ.पूर्णतः बंद राहतील.
३. मंगळवार व बुधवार (दिनांक ११/०५/२०२१ व १२/०५/२०२१) रोजी जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवेत,
मोडणाऱ्या आस्थापना किराणा दुकाने, ड्रायफ्रूट/सुकामेवाची दुकाने, मिठाईची दुकाने, डेअरी, चिकन, मन
विक्रीचे दुकाने व बेकरी संबंधित इ. केवळ सकाळी ०७.०० ते सकाळी १०.०० या वेळेत चालू राहतील.

४. गॅस वितरण दिवसभर सुरु राहील.
५. तसेच प्रत्येक दिवशी (दिनांक ०८/०५/२०२१ ते १२/०५/२०२१) पर्यंत केवळ पायदळ / गाडीवर / हातगाड्यावर
फिरुन दुध, भाजी व फळांची विक्री केवळ सकाळी ७.०० ते सकाळी १०.०० वाजेपर्यंत व फक्त फळांची विक्री
सायकांळी ०५.०० ते रात्री ०७.०० या वेळेत करता येईल.
६. बँकेचे कामकाज प्रत्येक दिवशी सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत अंतर्गत कामकाजासाठी व
शासकीय व्यवहारासाठी सुरु राहील. पेट्रोलपंप व गॅस एजंसी यांना कंपनीस देयके द्यावी लागतात तसेच
पेट्रोलपंपावर रोख रक्कम मोठ्या प्रमाणात जमा होते. करिता पेट्रोल पंप व गॅस एजंसी यांना सदर वेळेत बँकेत
जाऊन कामकाज करता येईल.
७. सर्व अधिकारी/कर्मचारी जे कोरोना विषयक कामकाज करत आहेत (उदा. डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य विभागाचे, महसूल विभागाचे, पोलीस विभागाचे, जिल्हा परिषदेचे इ.अधिकारी/ कर्मचारी) ज्यांचेकडे संबंधीत कार्यालय
प्रमुखाने दिलेले ओळखपत्र असेल त्यांनाच कार्यालयात ये-जा करण्याची मुभा असेल.
८. दिनांक ०८/०५/२०२१, ०९/०५/२०२१ व १०/०५/२०२१ या कालावधीत निबंध असलेल्या आस्थापना चालू असल्याचे निदर्शनास आल्यास त्या सिल करण्यात येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *