बीड

लॉकडाऊनमध्ये खते, बी-बियाणे आणि कृषि विषयक औषधांच्या वाहतूकीस सूट

कोव्हीड-19 चे वाढते रुग्ण संख्या लक्षात घेता दि.08.05.2021 ते 12.05.2021 पर्यंत निर्बंध लागू केले आहेत. संदर्भ क्र.2 अन्वये आपण कृषि आस्थापनाच्या व्यवहाराच्या अनुषंगाने लॉकडाऊनमध्ये खते, बी-बियाणे आणि कृषि विषयक औषधे यांच्या वाहतूकीच्या बाबतीत सूट देणेबाबत विनंती केली आहे. तसेच पेट्रोलपंप व गॅस एजन्सी यांना बँकांमध्ये सकाळी 10.00 ते दुपारी 12.00 वा. या वेळेत आर्थिक देवाण-घेवाण करण्यास परवानगी दिलेली आहे. त्याप्रमाणे कृषि आस्थापनांनाही परवानगी देणेबाबत विनंती केली आहे.


त्याअनुषंगाने कळविण्यात येते की, संदर्भ क्र.2 च्या विनंती च्या अनुषंगाने जिल्ह्यातील कृषि आस्थापनांना लॉकडाऊनमध्ये खते, बी-बियाणे आणि कृषि विषयक औषधे यांच्या वाहतूकीच्या बाबतीत दि.08.05.2021 ते 12.05.2021 या कालावधीत परवानगी देण्यात येत आहे. तसेच बँकेमध्ये त्यांना सकाळी 10.00 ते दुपारी 12.00 वा. या वेळेत आर्थिक देवाण-घेवाण करण्यास परवानगी देण्यात येत आहे. सदरील परवानगी कोव्हीड-19 चे सर्व नियम पाळण्याच्या अटीस अधिन राहून देण्यात येत आहेत.असे आदेश रविंद्र जगताप,जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष,जिल्हा आपत्ती व्यस्थापन प्राधिकरण,बीड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *