बीड जिल्ह्यात आज 1314 पॉझिटिव्ह:सर्वाधिक रुग्ण संख्या बीड तालुक्यात
बीड जिल्ह्यात आज दि 7 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4112 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1314 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2798 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
अंबाजोगाई 242 आष्टी 42 बीड 419 धारूर 91 गेवराई 54 केज 100 माजलगाव 76 परळी 123 पाटोदा 66 शिरूर 67 वडवणी 34
राज्यात ६२ हजार १९४ नवीन रुग्णांचे निदान
मुंबई: राज्यात गेल्या २४ तासांत राज्यात ६२ हजार १९४ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल निदान झालेल्या रुग्णांची संख्या ५७ हजार ६४० इतकी होती. कालच्या तुलनेत नव्या रुग्णसंख्येत काहीशी वाढ झाली असून असून हा फरक ४ हजार ५५४ इतका आहे. तर आज एकूण ६३ हजार ८४२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ५७ हजार ००६ इतकी होती. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ६ लाख ४३ हजार ७८२ वर जाऊन पोहचली आहे.
आज राज्यात एकूण ८५३ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ९२० इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आज ६३ हजार ८४२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण ४२ लाख २७ हजार ९४० रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.५४ टक्क्यांवर पोहोचले आहे.
करोना नियंत्रणात येईना! एका दिवसात ४,१४,१८८ रुग्ण बाधित
गुरुवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात गुरुवारी (६ मे २०२१) रेकॉर्डब्रेक ४ लाख १४ हजार १८८ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर याच २४ तासांत ३९१५ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याच दिवशी तब्बल ३ लाख ३१ हजार ५०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी १४ लाख ९१ हजार ५९८ वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण २ लाख ३४ हजार ०८३ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. मात्र, देशात आत्तापर्यंत १ कोटी ७६ लाख १२ हजार ३५१ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. देशात सध्या ३६ लाख ४५ हजार १६४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : २ कोटी १४ लाख ९१ हजार ५९८
एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : १ कोटी ७६ लाख १२ हजार ३५१
उपचार सुरू : ३६ लाख ४५ हजार १६४
एकूण मृत्यू : २ लाख ३४ हजार ०८३
करोना लसीचे डोस दिले गेले : १६ कोटी ४९ लाख ७३ हजार ०५८