जिल्हा रुग्णालय येथे सुरु असलेले लसीकरण केंद्र स्थलांतरीत:चंपावती शाळेत होणार लसीकरण-डॉ आर बी पवार
कोविड १९ महामारीच्या प्रतिबंधासाठी १६ जानेवारी पासुन कोविड १९ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.लसीकरण केंद्राच्या ठिकाणी होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी
लसीकरण कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हा रुग्णालय येथे सुरु असलेले लसीकरण केंद्र उदया दिनांक ७ मे २०२१ पासून चंपावती प्राथमिक शाळा बीड येथे स्थलांतरीत करण्यात येत आहे. लसीकरण सत्राची वेळ सकाळी ९:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे.
१८ वर्षावरील नागरीक व ४५ वर्षापेक्षा जास्त वय असणा-या नागरीक यांचे लसीकरण सत्र चंपावती प्राथमिक शाळेत वेगवेगळ्या ठिकाणी राबविण्यात येणार आहे.
१८ ते ४४ वर्षापर्यंतच्या नागरिकांनी ऑनलाइन वेळ घेऊनच यावे.अपॉइंटमेंट नसलेल्या लोकांनी अनावश्यक गर्दी करु नये. ४५ वर्षापेक्षा जास्त वय असणा-या २०० नागरिकांना उदया डोस देण्यात येणार आहेत. सुरुवातीला २०० नागरिकांचे डोस झाल्यावर राहिलेल्या नागरिकांनी नोंदणी करुन जावे.पुढील सत्रात त्यांना प्राधान्यक्रमाने लसीकरण करण्यात येईल.
प्रतिक्षा यादीनुसार लसीकरणा साठी यावे तसेच अनावश्यक गर्दी टाळुन प्रशासनास सहकार्य
करावे असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेले आहे.नागरिकांनी मास्क,सॅनिटायझर,कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य
करावे ही विनंती डॉ राधाकिसन पवार
जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केली आहे