बीड

कालचीच स्थिती:बीड जिल्ह्यात आज 1437 पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज दि 6 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4454 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1437 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3017 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 242 आष्टी 84 बीड 345 धारूर 85 गेवराई 107 केज 195 माजलगाव 58 परळी 58 पाटोदा 126 शिरूर 90 वडवणी 47

राज्यात नव्या करोना बाधित रुग्णांची संख्या स्थिरावली

मुंबई: राज्यात नव्या करोना बाधित रुग्णांची संख्या स्थिरावल्याचे दिसत असून गेल्या २४ तासांत राज्यात ५७ हजार ६४० नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल निदान झालेल्या रुग्णांची संख्या ५१ हजार ८८० इतकी होती. कालच्या तुलनेत नव्या रुग्णसंख्येत काहीशी वाढ झाली असून असून हा फरक ५ हजार ७६० इतका आहे. तर आज एकूण ५७ हजार ००६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ६५ हजार ९३४ इतकी होती. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ६ लाख ४१ हजार ५९६ वर जाऊन पोहचली आहे.

गेल्या २४ तासांत राज्यात ५७ हजार ६४० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
गेल्या २४ तासांमध्ये एकूण ५७ हजार ००६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
आज राज्यात एकूण ९२० करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

रेकॉर्ड ब्रेक नोंद:देशात बुधवारी ४ लाख १२ हजार २६२ करोनाबाधित रुग्ण

नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत नोंद झालेल्या आकडेवारीनं आजवरचे करोना संक्रमणाचे सगळे रेकॉर्ड तोडलेत. गुरुवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात बुधवारी (५ मे २०२१) एकूण ४ लाख १२ हजार २६२ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर याच २४ तासांत ३९८० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याच दिवशी तब्बल ३ लाख २९ हजार ११३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी १० लाख ७७ हजार ४१० वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण २ लाख ३० हजार १६८ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. मात्र, देशात आत्तापर्यंत १ कोटी ७२ लाख ८० हजार ८४४ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. देशात सध्या ३५ लाख ६६ हजार ३९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : २ कोटी १० लाख ७७ हजार ४१०
एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : १ कोटी ७२ लाख ८० हजार ८४४
उपचार सुरू : ३५ लाख ६६ हजार ३९८
एकूण मृत्यू : २ लाख ३० हजार १६८
करोना लसीचे डोस दिले गेले : १६ कोटी २५ लाख १३ हजार ३३९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *