कोरोना पाठ सोडेना:बीड जिल्ह्यात आज 1439 पॉझिटिव्ह
बीड जिल्ह्यात आज दि 5 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4192 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1439 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2753 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
अंबाजोगाई 280 आष्टी 71 बीड 328 धारूर 68 गेवराई 130 केज 150 माजलगाव 70 परळी 127 पाटोदा 38 शिरूर 138 वडवणी 39
मुंबई: राज्यात नव्या करोना बाधित रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून घट होत असून कालच्या तुलनेत आज आढळलेल्या नव्या रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ झाली आहे, प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात ५१ हजार ८८० नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर काल मंगळवारी एकूण ६५ हजार ९३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यात दिलासा म्हणजे आज नव्या रुग्णसंख्येपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. काल ही संख्या ५९ हजार ५०० इतकी होती. तसेच काल निदान झालेल्या रुग्णांची संख्या ४८ हजार ६२१ इतकी होती.कालच्या तुलनेत नव्या रुग्णसंख्येत काहीशी वाढ झाली असून असून हा फरक ३ हजार २५९ इतका आहे. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ६ लाख ४१ हजार ९१० वर जाऊन पोहचली आहे.
गेल्या २४ तासांत राज्यात ५१ हजार ८८० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
गेल्या २४ तासांमध्ये एकूण ६५ हजार ९३४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
आज राज्यात एकूण ८९१ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नवी दिल्ली : आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात मंगळवारी (४ मे २०२१) रोजी एकूण ३ लाख ८२ हजार ३१५ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर याच २४ तासांत ३७८० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याच दिवशी तब्बल ३ लाख ३८ हजार ४३९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ०६ लाख ६५ हजार १४९ वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण २ लाख २६ हजार १८८ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. मात्र, देशात आत्तापर्यंत १ कोटी ६९ लाख ५१ हजार ७३१ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. देशात सध्या ३४ लाख ८७ हजार २२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : २ कोटी ०६ लाख ६५ हजार १४९
एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : १ कोटी ६९ लाख ५१ हजार ७३१
उपचार सुरू : ३४ लाख ८७ हजार २२९
एकूण मृत्यू : २ लाख २६ हजार १८८
करोना लसीचे डोस दिले गेले : १६ कोटी ०४ लाख ९४ हजार १८८