बीड जिल्ह्यात आज 1499 पॉझिटिव्ह तर 1011जणांना डिस्चार्ज
बीड जिल्ह्यात आज दि 4 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4842 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1499 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3343 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
अंबाजोगाई 212 आष्टी 58 बीड 381 धारूर 68 गेवराई 119 केज 151 माजलगाव 68 परळी 126 पाटोदा 59 शिरूर 206 वडवणी 51
आज बीड जिल्ह्यात 1011 जण झाले कोरोनामुक्त
बीड- जिल्ह्यात आज 1011 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आजही चांगले आहे
नागरिकांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही,जिल्हा प्रशासन,आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आणि डॉक्टरांच्या अथक प्रयत्नातून शेकडो रुग्ण बरे होऊन घरी जात आहे आज तब्बल 1011 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत त्यांना आजच डिस्चार्ज देण्यात आला आहे
सध्या बीड जिल्ह्यात 59623 एकूण कोरोना बाधीत संख्या असून यापैकी 52030 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट 14.63% असून बरे होण्याचे प्रमाण 86.26 %आहे तर मृत्यू दर 1.64% आहे
सध्या 4951 बेड शिल्लक असून सध्या 6615 रुग्णांवर उपचार सुरू आहेत बीड जिल्ह्यात 11566 बेडची व्ययस्था करण्यात आली आहे, जिल्हा प्रशासनाने शासकीय रुग्णालय याबरोबरच जिल्ह्यातील मोठमोठे खाजगी दवाखाने रुग्णांसाठी आरक्षित केले आहेत सध्या जिल्ह्यात 152 ठिकाणी कोविड केअर सेंटरवर उपचारासाठी सुविधा तयार करण्यात आली आहे, सर्वांनी प्रशासनाचे नियमांचे पालन करावे,आपली आपल्या माणसांची काळजी घ्यावी,आतापर्यंत जिल्ह्यातील 978 रुग्ण दगावले आहेत दुर्दैवाने 29 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद पोर्टलवर आहे काल 959 ही संख्या होती