सात प्रलंबित अहवालात एक निघाला पॉझिटिव्ह
बीड
लातूर येथील प्रयोगशाळेतून अधिकृत माहिती बीड जिल्हा प्रशासनाकडे न आल्यामुळे गोंधळ उडाला आहे प्रलंबित अहवाला पैकी एकाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला असून सहा जणांचा निष्कर्ष तपासणीत अद्याप आढळून आलेला नाही आज पाठवण्यात आलेल्या 42 नमुन्यांपैकी 35 अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती देण्यात आली त्यात सात प्रलंबित अहवाल असल्याचे सांगण्यात आले काल एका मयताचा स्वब तपासणीसाठी पाठवण्यात आला होता तो रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आल्याचे सांगण्यात आले आहे बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या आता 30 झाली आहे
बीड येथील 7 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 6 व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आले आहेत अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.