बीड

बीड जिल्ह्यात आज 1345 पॉझिटिव्ह:आज बीड 338,गेवराई 183

बीड जिल्ह्यात आज दि 2 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4079 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1345 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2734 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 192 आष्टी 60 बीड 338 धारूर 62 गेवराई 183 केज 148 माजलगाव 65 परळी 106 पाटोदा 48 शिरूर 104 वडवणी 39

दि 13 एप्रिल पासून बीड जिल्ह्यातील रुग्ण संख्या 900 ने सुरू झाली ती आता दिड हजाराच्या पुढे गेली आहे विशेष म्हणजे लॉक डाऊन चालू असतानाही ही वाढ होणे नक्कीच विचार करण्यासारखी आहे,बाधीत आणि त्यांच्या सहवासात असणाऱ्या लोकांच्या टेस्ट केल्यामुळे हे उघड पडत आहे कोरोनाने शहरी आणि ग्रामीण भागात चांगलाच विळखा मारला असल्याचे दिसून येत आहे,यामुळे आरोग्य प्रशासनावर मोठा ताण पडू लागला आहे

महाराष्ट्रात ८०२ रूग्णांचा मृत्यू

राज्यात शनिवारी ८०२ रूग्णांचा मृत्यू झाला असून, ६३ हजार २८२ नवीन करोनाबाधित आढळून आले. सध्या राज्यातील मृत्यू दर १.४९ टक्के एवढा आहे. ६१ हजार ३२६ रुग्ण बरे देखील झाले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ३९,३०,३०२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८४.२४ टक्के आहे.

पहिल्यांदाच एका दिवसात ३ लाखाहून अधिक रुग्ण बरे

गेल्या २४ तासांच भारतात आढळून आलेल्या नवीन रुग्णांची संख्या ही ३ लाख ९२ हजार ४५९ इतकी आहे. म्हणजेच ५० देशांमधील करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या एकत्र केली तरी त्याहून अधिक संख्या ही एकट्या भारतात आहे.

गेल्या २४ तासांत दिलासा देणाऱ्या २ बातम्या आल्या आहेत. पहिली म्हणजे शुक्रवारच्या तुलनेत संसर्ग होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत ९५५५ ने कमी दिसून आली आहे. देशात शुक्रवारी विक्रमी ४ लाख २ हजार १४ इतके नवीन रुग्ण आढळून आले होते. ही संख्या शनिवारी कमी होऊन ३ लाख ९२ हजार ४५९ इतकी आहे. दुसरीकडे गेल्या २४ तासांत जगात सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत. भारतात मृतांची संख्याही ३६८४ इतकी झाली आहे. ब्राझीलमध्ये करोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या ही २२७८ इतकी आहे. तिसऱ्या क्रमांकावर आमेरिका आहे. अमेरिकेत शनिवारी ६६१ जणांचा मृत्यू झाला आहे.

शनिवारी करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे अधिक होते. पहिल्यांदाच एका दिवसात ३ लाखाहून अधिक नागरिक बरे झाले. देशात शनिवारी ३ लाख ८ हजार ५२२ जण करोनामुक्त झाले. जगात कुठल्याच देशात इतरे रुग्ण बरे झाले नाही. यापूर्वी शुक्रवारी २.९९ लाख नागरिक करोनामुक्त झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *