ऑनलाइन वृत्तसेवामहाराष्ट्रमुंबई

आंबे,कोंबडी,मटण,अंडी व अन्य खाद्यपदार्थ घरपोच विक्रीस मुभा

मुंबई : आठवडाभर सकाळी ७ ते ११ यावेळेत आंबे, कोंबडी, मटण, अंडी व अन्य खाद्यपदार्थांशी संबंधित दुकाने सकाळी ७ ते ११ पर्यंत खुली ठेवण्यास राज्य सरकारने शनिवारी परवानगी दिली. सकाळी ११ नंतर केवळ घरपोच विक्रीला मुभा असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट के ले आहे.

आंबे, कोंबडी, मटण, अंडी आदींच्या विक्रीबाबत निर्बंधकाळात काय नियम आहेत याबाबत राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे विचारणा होत होती.

त्यावर आठवड्यातील सातही दिवस सकाळी ७ ते ११ यावेळेत आंबे, कोंबडी-मटण, अंडी दुकानदारांना विक्रीची परवानगी असून सकाळी ११ नंतर मात्र के वळ घरपोच विक्रीला मुभा असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी एका आदेशाद्वारे स्पष्ट के ले आहे. आंबा विक्री करणाऱ्यांना सकाळी ११ नंतर आंब्याची प्रतवारी करणे आदी दुकानातील कामे करता येतील, असेही स्पष्ट करण्यात आले.

उत्तर प्रदेश व पश्चिाम बंगालमधील परिस्थिती पाहता करोनाचे घातक विषाणू या राज्यांतून महाराष्ट्रात येऊ नये यासाठी या दोन्ही राज्यांचा समावेश संवदेनशील उगमस्थानांच्या यादीत करण्यात आला आहे. या राज्यांतून महाराष्ट्रात प्रवास करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. यानुसार या राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांना करोना नसल्याचा चाचणीचा अहवाल सादर करणे बंधनकारक असेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *