बीड

बीड जिल्ह्यात लसीकरण साठी काय आहेत नियम:कुठे आणि कशी मिळेल लस

कोव्हिड-१९ आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी कोव्हिड लसीकरण मोहीम जिल्ह्यात सुरु करण्यात आलेली आहे, दि. ३० एप्रिल पर्यत आरोग्य कर्मचारी, पहिल्या फळीतील कर्मचारी व ४५ वर्षापेक्षा जास्त वय असलेले नागरीक यांचे लसीकरण करणे सुरू होते. एकूण १८४१३६ जणांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आलेला असून ४०२५६ जणांचे दुसऱ्या डोससहीत लसीकरण पूर्ण करण्यात आलेले आहे.

दि. १ मे २०२१ पासून जिल्ह्यात १८ वर्षावरील नागरिकांना लसीकरण सुरु करण्यात आलेले आहे .सद्यस्थितीत जिल्ह्यात पाच ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करण्यात आलेली असून या ठिकाणी दररोज २०० जणांना लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात स्वा.रा.ति. वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई, जिल्हा रुग्णालय बीड, उपजिल्हा रुग्णालय परळी, उपजिल्हा रुग्णालय गेवराई, व ग्रामीण रुग्णालय आष्टी या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करण्यात आली असून नागरिकांना आवाहन करण्यात येत की,ऑनलाईन रजिस्ट्रेशन करुन व ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊनच लसीकरण करण्यात येणार आहे.

ऑनलाईन रजिस्ट्रेशन करुन व ऑनलाईन अपॉईंटमेंट शिवाय लसीकरण करण्यात येणार नाही.नागरिकांना याव्दारे आवाहन करण्यात येते की,लसीकरण केंद्रावर अनावश्यक गर्दी टाळावी तसेच ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतल्यानंतर दिलेल्या वेळेतच लसीकरण केंद्रावर जाऊन मास्क वापरुन आणि सोशल
डिस्टस पाळून शांततेने लसीकरण करुन घ्यावे. लसीच्या उपलब्धतेनुसार लसीकरण केंद्रामध्ये वाढ करण्यात येणार असुन नजिकच्या काळात सर्वांचेच लसीकरण पूर्ण करण्यात येणार असून नागरिकांनी सयंम बाळगावा व शांततेत लसीकरण करुन घ्यावे. ४५ वर्षावरील नागरिकांना मात्र दोन्ही पध्दतीने म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करुन अपॉईंटमेंट घेऊन तसेच थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करता येईल. परंतु याबाबत नजिकच्या प्रा.आ. केंद्रामध्ये किंवा आरोग्य संस्थेमध्ये लसीची उपलब्धता पाहुनच लसीकरण केंद्रात जावे. व अनावश्यक गर्दी टाळावी असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *