बीड

जिल्हाधिकारी साहेब आता मनुष्यबळ देखील उपलब्ध करा

बीड शहरासह जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे, त्या तुलनेत रुग्णालयातील मनुष्यबळ अपुरे ठरत आहे. यामुळे एमडी, एमबीबीएस डॉक्‍टरांसह वैद्यकीय अधिकारी यांच्यासह नर्स, आरोग्य सेविका, क्ष-किरण तंत्रज्ञ यांची नियुक्‍ती तातडीने करणे गरजेचे आहे.केवळ कोविड सेन्टर करून उपयोग नाही तर मनुष्यबळ देखील आता उपलब्ध करणे गरजेचे आहे भविष्यात तिसरी लाट रोखायची असेल तर आरोग्य सेवेशी निगडित असणारी भरती आता तातडीने होणे महत्त्वाचे आहे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी याकडे लक्ष देऊन ही उपाय योजना करावी आता लसीकरण मोहीम देखील सुरू झाली आहे यासाठी सरकारी रुग्णालयाबरोबर खाजगीत देखील लस उपलब्ध करून दिल्या तर सरकारी वरचा ताण कमी होईल सध्या खाजगीत लस पुरवठा बंद केल्याने सरकारी दवाखान्यात गर्दी होऊ लागली आहे ही बाब लक्षात घेणे गरजेचे आहे

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून शहरासह ग्रामीण भागात करोनाची दुसरी लाट सुरू झाली. अवघ्या महिन्याभरात या लाटेने जिल्ह्यात कहर माजवायला सुरवात केली. विशेषत: ग्रामीण भागात बाधितांची संख्या दुप्पट ते तीप्पटीने वाढू लागल्यामुळे उपचारासाठी नागरिकांची धावपळ सुरू झाली. अशा परिस्थितीत ग्रामीणमध्ये रुग्णांना उपचार देताना अपुऱ्या मनुष्यबळामुळे आरोग्य विभागावर मोठा ताण येत आहे. आशा स्थितीत मनुष्यबळ पुरेसे उपलब्ध असणे गरजेचे आहे रुग्णांना सुविधा देण्याबरोबरच प्रत्येक ठिकाणी त्या त्या विभागाचे तज्ञ आवश्यक आहेत,पदभरतीमध्ये एमडी डॉक्‍टर,एमबीबीएस, बीएएमएस डॉक्‍टर, जीएनएम, एएनएम, डाटा ऑपरेटर, तंत्रज्ञ,इसीजी तंत्रज्ञ यांची नियुक्‍ती करणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *