बीड जिल्ह्यात आज 1520 पॉझिटिव्ह:आज बीड 298,अंबाजोगाई 236
बीड जिल्ह्यात आज दि 30 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4717 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1520 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3197 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
अंबाजोगाई 236 आष्टी 187 बीड 298 धारूर 86 गेवराई 155 केज 198 माजलगाव 65 परळी 116 पाटोदा 65 शिरूर 80 वडवणी 34
?V=9
राज्यात दिलासादायक बातमी
एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या २४ तासात राज्यात ६८,५३७ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण ३७,९९,२६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
याशिवाय गेल्या २४ तासात राज्यात ६६,१५९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे तर ७७१ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे .राज्यात आतापर्यंत एकूण ३७,९९,२६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यात सध्या ६,७०,३०१ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ८३.६९ टक्क्यांवर आला आहे.
देशात 24 तासात तब्बल 3 लाख 86 हजार 888 कोरोनाबाधित रूग्ण आढळले
देशात आतापर्यंतच्या सर्वोच्च कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली. 24 तासात तब्बल 3 लाख 86 हजार 888 कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून, मृत पावणाऱ्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं, 24 तासात एकुण 3 हजार 501 रूग्णांचा देशात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे हा आकडा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे.
आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याने देशात मृत्यू दरही झपाट्याने वाढत असल्याचं दिसून येत आहे. मागच्या 24 तासात देशात 2 लाख 95 हजार 489 रुग्ण कोरोनातुन बरे झाले आहेत. त्याचबरोबर, सध्या भारतात एकूण 31 लाख 64 हजार 825 सक्रिय रूग्णसंख्या आहे.