बीड

आजही चांगली खबर:बीड जिल्ह्यात आज 1026 जणांना डिस्चार्ज

बीड- जिल्ह्यात बऱ्या होणाऱ्या रुग्णाची संख्या आजही चांगली आहे,नागरिकांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही,जिल्हा प्रशासन , आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आणि डॉक्टरांच्या अथक प्रयत्नातून शेकडो रुग्ण बरे होऊन घरी जात आहे आज तब्बल 1026 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत त्यांना आजच डिस्चार्ज देण्यात आला आहे

सध्या बीड जिल्ह्यात 52491 एकूण कोरोना बाधीत संख्या असून यापैकी 45628 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट 13.62% असून बरे होण्याचे प्रमाण 86.92 %आहे तर मृत्यू दर 1.69% आहे

सध्या 4651 बेड शिल्लक असून सध्या 5974 रुग्णांवर उपचार सुरू आहेत बीड जिल्ह्यात 10625 बेडची व्ययस्था करण्यात आली आहे, जिल्हा प्रशासनाने शासकीय रुग्णालय याबरोबरच जिल्ह्यातील मोठमोठे खाजगी दवाखाने रुग्णांसाठी आरक्षित केले आहेत सध्या जिल्ह्यात 138 ठिकाणी कोविड केअर सेंटरवर उपचारासाठी सुविधा तयार करण्यात आली आहे,सर्वांनी प्रशासनाचे नियमांचे पालन करावे,आपली आपल्या माणसांची काळजी घ्यावी,आतापर्यंत जिल्ह्यातील 889 रुग्ण दगावले आहेत दुर्दैवाने 5 जणांचा मृत्यू झाला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *