बीड

बीड जिल्ह्यात आज 1470 पॉझिटिव्ह:आज बीड 320,अंबाजोगाई 215

बीड जिल्ह्यात आज दि 29 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4902जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1470 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3432 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 215 आष्टी 133 बीड 320 धारूर 84 गेवराई 200 केज 131 माजलगाव 52 परळी 119 पाटोदा 75 शिरूर 85 वडवणी 56

राज्यात बुधवारी 63 हजार 309 रुग्णांची नोंद

महाराष्ट्रात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याचवेळी नव्याने रुग्ण वाढीचे प्रमाण ‘जैसे थे’च आहे. राज्यात बुधवारी 63 हजार 309 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात मृत्यूदर 1.5 टक्के इतका आहे. बुधवारी 61 हजार 181 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 37 लाख 30 हजार 729 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. बुधवारी सर्वाधिक 985 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्य स्थितीत राज्यात एकूण 6 लाख 73 हजार 481 सक्रिय रुग्ण आहेत.

देशात पुन्हा तब्बल 3 लाख 80 हजार रुग्णांची नोंद

नवी दिल्ली, 29 एप्रिल : देशात कोरोना संसर्ग झपाट्याने (Corona in India) वाढत आहे. दररोज कोरोनाबाधितांचे रेकॉर्ड ब्रेक आकडे समोर येत आहेत. देशातील जवळपास सर्वच राज्यांंमध्ये बाधित रुग्णांची सातत्याने वाढ होत आहे. या भयानक स्थितीत लोकांना रुग्णालयात खाटा मिळणे मुश्कील झाले असून आणि रुग्णांचा उपचाराविना मृत्यू (Corona Death) होत आहे. बुधवारी देशात पुन्हा तब्बल 3 लाख 80 हजार रुग्णांची नोंद झाली तर 3,646 लोकांचा मृत्यू झाला. दिलासादायक ठरणारी एकमेव बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Corona Recovery Rate) वाढले असून गेल्या 24 तासात 2 लाख 70 हजार रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *