बीड

बीड जिल्ह्यात आज 1346 पॉझिटिव्ह:आज बीड पुन्हा तीनशेच्या पुढे

बीड जिल्ह्यात आज दि 28 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4489 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1346 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3143 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 260 आष्टी 54 बीड 348 धारूर 72 गेवराई 131 केज 145 माजलगाव 58 परळी 75 पाटोदा 67 शिरूर 79 वडवणी 57

गेल्या २४ तासांमध्ये एकूण ६७ हजार ७५२ करोना बाधित रुग्ण बरे

मुंबई: राज्यात नव्या करोना बाधित रुग्णांची वाढ काल कमी झालेली असताना काल पुन्हा एकदा रुग्णसंख्येने उचल खाल्ली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ६६ हजार ३५८ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. सोमवारी ही संख्या ४८ हजार ७०० इतकी होती. त्या तुलनेत मंगळवारी मोठी वाढ झाली असून हा फरक १७ हजार ६५८ इतका आहे. या बरोबरच, गेल्या २४ तासांमध्ये एकूण ६७ हजार ७५२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल ही संख्या ७१ हजार ७३६ इतकी होती. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ६ लाख ७२ हजार ४३४ वर जाऊन पोहचली आहे.
आज राज्यात एकूण ८९५ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ४२४ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५ टक्के इतका आहे. याबरोब राज्यात आज ६७ हजार ७५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण ३६ लाख ६९ हजार ५४८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.२१ टक्क्यांवर आले आहे.राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६ लाख ७२ हजार ४३४ इतकी झाली आहे.

देशात 2,61,162 रुग्ण कोरोनामुक्त

भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा दररोज नवा उच्चांक गाठत आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 360,960 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3293 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. दरम्यान, 2,61,162 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

यापूर्वी सोमवारी देशात 323,023 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं.

गेल्या तीन दिवसांत देशात 1 मिलियनहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 25 एप्रिलपासून 27 एप्रिलपर्यंत अनुक्रमे 3.52 लाख, 3.23 लाख, 3.60 लाख कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. हा आकडा जगातील कोणत्याही देशाच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

देशातील आजची कोरोना स्थिती :

एकूण कोरोनाबाधित रुग्ण : एक कोटी 79 लाख 97 हजार 267
एकूण मृत्यू : 2 लाख 1 हजार 187
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : एक कोटी 48 लाख 17 हजार 371
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण : 29 लाख 78 हजार 709

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *