बीड जिल्ह्यात आज 1297 पॉझिटिव्ह:आज बीड तीनशेच्या पुढे
बीड जिल्ह्यात आज दि 27 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4397 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1297 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3100 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
अंबाजोगाई 206 आष्टी 138 बीड 313 धारूर 52 गेवराई 84 केज 171 माजलगाव 44 परळी 85 पाटोदा 77 शिरूर 82 वडवणी 45
राज्यात काल ७१ हजार ७३६ करोना बाधित रुग्ण बरे झाले
मुंबई: राज्यात नव्या करोना बाधित रुग्णांची वाढ वेगवान गतीनेच होत असताना काल सोमवारी राज्यातील जनतेला मोठा दिलासा देणारे वृत्त आहे. गेल्या काही दिवसांपासून ६५ हजार ते ७० हजारांच्या घरात वाढणाऱ्या रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. त्यानुसार गेल्या २४ तासांत राज्यात ४८ हजार ७०० नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या ६६ हजार १९१ इतकी होती. रविवारच्या तुलनेत सोमवारी मोठी घट झाली असून हा फरक १७ हजार ४९१ इतका आहे. या बरोबरच, गेल्या २४ तासांमध्ये एकूण ७१ हजार ७३६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल ही संख्या ६१ हजार ४५० इतकी होती. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ६ लाख ७४ हजार ७७० वर जाऊन पोहचली आहे.
सोमवारी राज्यात एकूण ५२४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ८३२ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५ टक्के इतका आहे. याबरोब राज्यात आज ७१ हजार ७३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण ३६ लाख ०१ हजार ७९६ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.९२ टक्क्यांवर आले आहे.
देशात सोमवारी २ लाख ५१ ८२७ रुग्णांना डिस्चार्ज
नवी दिल्ली : देशात, सोमवारी (२७ एप्रिल २०२१) रोजी एकूण ३ लाख २३ हजार १४४ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. देशात सध्या २८ लाख ८२ हजार २०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कालच्या २४ तासांत देशात तब्बल २ हजार ७७१ करोनाबाधित रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. सोमवारी एकूण २ लाख ५१ हजार ८२७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटी ७६ लाख ३६ हजार ३०७ वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण १ लाख ९७ हजार ८९४ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. सध्या देशात २८ लाख ८२ हजार २०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.