बीड जिल्ह्यात आज 1086 पॉझिटिव्ह:सर्वाधिक बीडमध्येच
बीड जिल्ह्यात आज दि 26 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3557 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1086 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2471 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
अंबाजोगाई 203 आष्टी 98 बीड 246 धारूर 62 गेवराई 99 केज 109 माजलगाव 49 परळी 106 पाटोदा 41 शिरूर 21 वडवणी 52
राज्यात 61 हजार 450 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले
मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. राज्यात आज 66 हजार 191 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर रविवारी 61 हजार 450 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 35 लाख 30 हजार 60 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.19 टक्के झाले आहे. राज्यात एकूण 6 लाख 98 हजार 354 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यात आज एकूण 832 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. सध्या मृत्यूदर 1.51 टक्के आहे.
देशात २ लाख १८ हजार ६२४ रुग्णांनी केली करोनावर मात
नवी दिल्ली : देशात, रविवारी (२६ एप्रिल २०२१) रोजी एकूण ३ लाख ५४ हजार ६५३ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. देशात सध्या २८ लाख ०७ हजार ३८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कालच्या २४ तासांत देशात तब्बल २ हजार ८०८ करोनाबाधित रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. देशात रविवारी एकूण २ लाख १८ हजार ६२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटी ७३ लाख ०६ हजार ४२० वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण १ लाख ९५ हजार ११८ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. सध्या देशात २८ लाख ०७ हजार ३८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत किंवा हे रुग्ण डॉक्टरांच्या निर्देशावर आपल्या घरीच आयसोलेशनमध्ये राहून उपचार घेत आहेत. देशात आत्तापर्यंत १ कोटी ४२ लाख ९६ हजार ७०३ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत.
एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : १ कोटी ७३ लाख ०६ हजार ४२०
एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : १ कोटी ४२ लाख ९६ हजार ७०३
उपचार सुरू : २८ लाख ०७ हजार ३८८
एकूण मृत्यू : १ लाख ९५ हजार ११८
करोना लसीचे डोस दिले गेले : १४ कोटी ०९ लाख १६ हजार ४१७